देऊळ बंद 2 नंतर प्रविण तरडेंची मोठी घोषणा! लवकरच येणार मुळशी पॅटर्न 2

Mulshi Pattern 2 चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक प्रविण तरडेंनी त्यांच्या आगामी सिक्वेलची घोषणा केली.

Mulashi Pattern 2

Mulashi Pattern 2

Mulshi Pattern 2 coming soon Pravin Tarde’s big announcement after Deul Band 2 : दिग्दर्शक प्रविण तरडेंच्या तब्बल 11 वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ या बहुचर्चित सिक्वेलनेही प्रदर्शित होताच मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॉकबस्टर एन्ट्री करत प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवला आहे. त्यानंतर लगेचच तरडेंनी त्यांच्या आगामी सिक्वेलची घोषणा केली आहे. त्यामुळे आता लककरच प्रचंड गाजलेल्या मुळशी पॅटर्न चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिंदेंच्या दोन उमेदवारांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा! ठाणे अन् यवतमाळमध्ये विधान परिषद बिनविरोध

त्यामुळे प्रेक्षकांसाठी हे खास सरप्राईज ठरलं आहे. याबाबत सांगताना तरडे म्हणाले की, मुळशी पॅटर्न 2 हा पहिल्या भागातील आरारा… खतरनाक या डायलॉग पेक्षाही खतरनाक असणार आहे. दरम्यान पहिला भाग हा शेतीशी संबंधित होता. त्यामुळे दुसऱ्या भागाचा विषय काय असणार याची देखील उत्सुकता संपली आहे. कारण तरडेंनी हा भाग कशावर आधारिक असणार आहे. देखील सांगितले आहे.

पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड

एका युट्युब चॅनेलला मुलाखत देताना दिग्दर्शक प्रविण तरडेंनी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ नंतर मी आता मुळशी पॅटर्न 2 कडे वळणार आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, पहिला भाग हा शेतीशी संबंधित होता. दुसरा भाग हा तुमच्या आमच्या स्वप्नातील घर महाग का झालं त्या वाळूवर आधारित असणार आहे. असं म्हणत त्यांनी दुसऱ्या भागाचा विषय काय असणार? हे सांगितलं आहे.

Exit mobile version