Mumbai Local Trailer Launch : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास ‘मुंबई लोकल’ या (Mumbai Local) चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला. ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजीत (Marathi Film) यांनी केलं आहे.
बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती केली. निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर त्र्यंबक डागा हे (Entertainment News) सहनिर्माते आहेत. प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर ही नवी फ्रेश जोडी प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.
चीन की पाकिस्तान? भारताचा सर्वात मोठा शत्रू, प्यू रिसर्चच्या अहवालात धक्कादायक खुलासा…
आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती आणि आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो ‘मुंबई लोकल’च्या प्रवासात एकमेकांना पाहतात. तिथून त्यांची गोष्ट सुरू होते. या प्रवासातच त्यांच्या प्रेमकहाणीला हिरवा सिग्नल मिळतो. पण त्यांच्या आयुष्यात अस काय काय घडतं याची रंजक गोष्ट या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. दोघांमध्ये फुलत जाणाऱ्या नात्याप्रमाणेच चित्रपटाचा ट्रेलर ही हळूहळू उलगडत जातो आणि नक्कीच उत्सुकता वाढवतो . प्रथमेश आणि ज्ञानदा ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने चित्रपटाला नवा आयाम मिळाला आहे. उत्तम अभिनेत्यांची फौजच या चित्रपटात असल्याने अभिनयाची आघाडी सक्षम आहे. त्याशिवाय लेखन, छायांकन, संगीत अशा सर्वच बाजूंवर हा चित्रपट मजबूत आहे. या सगळ्याचं प्रतिबिंब ट्रेलरमध्ये उमटत आहे. म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच चित्रपटगृहात आणण्यात यशस्वी ठरणार आहे, यात शंका नाही. त्यामुळे लोकल प्रवासात फुलणारी प्रेमाची गोष्ट पाहण्यासाठी आता 1 ऑगस्टपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
लग्नाचे योग, अचानक धनलाभ; आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार खास
‘मुंबई लोकल’ चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली. मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे तर विनोद शिंदे हे क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि कलादिग्दर्शक डॉ. सुमित पाटील आहेत. चित्रपटातील गाणी गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांची असून देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी व हर्षवर्धन वावरे यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केले आहे तर पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे. असोसिएट प्रोड्यूसर म्हणून निकुंज मालपाणी यांनी काम पाहिले आहे तर नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचे आहे.