Download App

Kasturi: ठरलं! सफाई कामगाराची कथा सांगणारा ‘कस्तुरी’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Nagaraj Manjule: झपाटलेली माणसं येडी होत असतात, आणि येडी माणसंच इतिहास घडवत असतात अन् शहाणी माणसं ती वाचत असतात हे वाक्य आपण चांगलच ऐकलं असेल. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील विनोद कांबळेला देखील असंच वेड लागलं होतं, तोही असाच पछाडला होता. (Marathi Movie) परंतु हे वेड होतं सिनेमा पाहण्याचं, सिनेमा बनविण्याचं आणि सिनेमा जिंकण्याचं. तब्ब्ल 7 वर्षांच्या संघर्षातून, सातत्याच्या प्रयत्नातून अखेर विनोद जिंकला आहे, त्याचा सिनेमा देखील जिंकला आहे. विनोद कांबळे दिग्दर्शित ‘कस्तुरी’ (Kasturi) हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात येणार आहे.


बार्शीसारख्या ग्रामीण भागातील तरुण, कौटुंबिक पार्श्वभूमीचं बघितलं तर लहानपणी घरी टीव्ही नसल्यानं नीट पिच्चर देखील पहायला मिळाले नाही. (Social media) आणि पिढ्यान-पिढ्या सफाई कामगार म्हणून राबणाऱ्या गरीब कुटुंबामध्ये विनोदचा जन्म. वडिल आजही बार्शी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत, तर आईही अशिक्षित. सिनेमा म्हणजे थिल्लरपणा आणि टाइमपास असाच सर्वांचा समज.

त्यामुळेच, महाराष्ट्र विद्यालयातून दहावी, तर शिवाजी कॉलेजमधून बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर कराडच्या शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजला विनोदने प्रवेश घेतला होता. आता पोरगा इंजिनिअर होणार म्हणून आई-वडिलांचा आनंद बार्शीत मावेना. परंतु पोराच्या मनात अनोखं काहीतरी सुरू होतं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर आई-वडिलांच्या आग्रहास्तव विनोदने नोकरी पत्करलीही, परंतु मन स्वस्थ बसू देईना. सरकारी नोकरीसाठी एमपीएससी परीक्षाही दिली. परंतु तो आपला पिंडच नाही, हेही त्याला माहिती होतं.

नेमकं काय आहे ‘कस्तुरी’

कस्तुरी ही गटारातील गाळ काढणाऱ्या सफाई कामगाराची रंजक अशी कथा आहे, कथेचा नायक शाळकरी मुलगा आहे, ज्याच्या अंगाचा खूपच घाण वास येत असतो. आपल्या अंगाचा येणारा घाण वास टाळण्यासाठी तो अत्तर लावतो, एका मित्राकडून कस्तुरीविषयी त्याला माहिती मिळते. आणि मग काय हा नायक कस्तुरीच्या शोधात वण वण फिरत असतो, पारध्याजवळ तुला कस्तुरी मिळेल हे त्याला समजते, अखेर तो पारध्यापाशी जातो. मग, कस्तुरी मिळते की नाही, खरी कस्तुर कुठे असते, हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा नक्कीच पाहा.

Kiran Mane: किरण मानेंची ‘बिग बॉस’च्या आठवणीत भावुक पोस्ट; म्हणाले, अजूनबी विश्वास..

दिग्दर्शकाने ‘कस्तुरी’च्या माध्यमातून समाजव्यवस्थेवर प्रहार केला आहे. आज देखील मेहतर समाजावर आघात करणाऱ्या वास्तवाला त्यांनी जगासमोर मांडल आहे. कस्तुरी म्हणजे ‘आप्त दिपं भवं’.. स्वत:चा शोध घेणं. अकरावीत शिकणारा समर्थ सोनवणे हा मुख्य नायकाच्या भूमिकेत असून श्रवण उपळकरचाही अभिनय लक्षवेधी आहे, दोन्ही कलाकार बार्शीचे आहेत. सिनेमाची सिनेमाटोग्राफी करणारे मनोज काकडे हेही मूळ बार्शीचे असून सध्या पुण्यात स्थायिक आहेत. नवकलाकारांना, ग्रामीण भागातल्या कलाकारांना घेऊन बनवलेल्या दिग्दर्शकाने बनवलेल्या कस्तुरीचा सुगंध देशभर दरवळणार आहे. तसेच नागराज मंजुळे हे आमच्याच जिल्ह्यातले असल्याने प्रेरणास्त्रोत आहेत, तर अनुराग कश्यप आणि विशाल भारद्वाज हे आवडीचे दिग्दर्शक असल्याचं विनोद यांनी सांगितलं.

Tags

follow us