Nana Patekar: व्हायरल व्हिडिओवर नाना पाटेकरांचे स्पष्टीकरण, म्हणाले, “मी कोणालाही…”

Nana Patekar On Video Viral: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात. मात्र यावेळी ते चाहत्यांच्या निशाण्यावर सापडले आहेत. (Video Viral) नाना पाटेकर यांनी रागाच्या भरात एका चाहत्याला थप्पड मारली आहे. अभिनेत्याने चाहत्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या (Director) […]

Nana Patekar: 'त्या' व्हायरल व्हिडिओबद्दल नानांनी मागितली माफी, म्हणाले, "मी कोणालाही..."

Nana Patekar: 'त्या' व्हायरल व्हिडिओबद्दल नानांनी मागितली माफी, म्हणाले, "मी कोणालाही..."

Nana Patekar On Video Viral: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात. मात्र यावेळी ते चाहत्यांच्या निशाण्यावर सापडले आहेत. (Video Viral) नाना पाटेकर यांनी रागाच्या भरात एका चाहत्याला थप्पड मारली आहे. अभिनेत्याने चाहत्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या (Director) दिग्दर्शकाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. आता नाना पाटेकरांनी व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.


नाना पाटेकर व्हिडिओ वाराणसीतील दशाश्वमेध घाटातील आहे. अभिनेता गेल्या अनेक दिवसांपासून येथे त्याच्या आगामी ‘जर्नी’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दशाश्वमेध घाटाच्या वाटेवर नानांच्या ‘जर्नी’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. कपडे आणि टोपी घालून नाना शूटिंगसाठी तयार झाले होते. नानांचे लक्ष शूटिंग आणि त्यांच्या संवादांवर होते.

नानांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे. यामध्ये त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच अनावधानाने ती चूक झाल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. “मी एका मुलाच्या डोक्यात मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आमच्या सिनेमातील सीनचा तो भाग आहे. त्या व्हिडिओमध्ये मी टोपी घातली आहे. एक व्यक्ती मला पाठीमागून टोपी विकायची आहे का? असं विचारतो. तो जेव्हा पुढे येतो तेव्हा मी त्याला मारतो आणि हे बघ ही बोलण्याची पद्धत नाही, नीट वाग असं म्हणतो…त्यानंतर तो पळून जातो…असा तो सीन होता, असं नाना यावेळी सांगितले आहे.

त्यानंतर नाना म्हणाले की, आम्ही एक रिहर्सल केली होती. मात्र, दिग्दर्शक म्हणाले आणखी एकदा करू. आम्ही रिहर्सल सुरूच करणार होतो. तेवढ्यातच व्हिडिओत दिसणारा मुलगा सीनमध्ये आला. तो मुलगा कोण आहे, हे मला माहीत नव्हतं. तो मुलगा सीनमधीलच आहे, असं मला वाटलं. यामुळे मी सीनप्रमाणे त्याच्या डोक्यात मारलं. परंतु, मला नंतर कळलं की तो दुसराच कोणीतरी मुलगा होता. मात्र, जोपर्यंत मी त्याला बोलवेन तो पळून गेला होता. कदाचित त्याच्या मित्राने तो व्हिडिओ शूट केला असावा. असे यावेळी नानांनी सांगितले.

नाना पाटेकरच्या व्हायरल व्हिडीओवर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘हा तर सीन…’

या व्हिडिओमागील सत्याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी भाष्य केले आहे, ते म्हणाले, ‘मला नुकतीच ही बातमी कळली आहे. मी आत्ता तोच व्हिडिओ पाहत होतो. नानांनी कोणाच्याही कानाखाली थप्पड मारली नाही, तर तो माझ्या चित्रपटाचा सीन आहे. बनारसच्या मधोमध रस्त्यावर आम्ही त्याचे चित्रीकरण करत होतो. या ठिकाणी नानांच्या जवळ आलेल्या मुलाला डोक्यावर मारावे लागते. शुटिंग चालू होते आणि नानांनी त्यालाही मारले. मात्र तेथे जमलेल्या जमावाने ते आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले आणि त्यानंतर चित्रपटाचा सीन लीक केला. आता सोशल मीडियावर नानांना नकारात्मक आणि असभ्य अभिनेता म्हणून त्यांना ट्रोल केले जात आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. मी विनंती करतो की, चाहत्यांनी या व्हिडिओचे सत्य समजून घ्यावे. हा चित्रपटाचा सीन आहे. असे यावेळी दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितले आहे.

Exit mobile version