Nana Patekar : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची लंडन येथे असणारी वाघनखे (Wagh Nakh) लवकरच देशात घेऊन येणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) स्वत: वाघनखे आणायला लंडनमध्ये जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी एक पोस्ट शेअर करत मुनगंटीवारांना चांगलच फटकारलं असल्याचे बघायला मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी एक पोस्ट शेअर करत सुधीर मुनगंटीवारांना चांगलच सुनावलं आहे. त्यांनी पोस्ट मध्ये लिहिलं आहे की,”मुनगंटीवार महाराजांची वाघनखे आणत आहेत..त्याबद्दल अभिनंदन…जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा”. अशी पोस्ट अभिनेते नाना पाटेकर यांनी यावेळी केली आहे.
परंतु तुम्हाला डोळ्यावरील पट्टीमुळे दिसत नाही, भ्रष्टाचाराचा कोथळा काढायचा म्हणजे स्वत:च्या सरकारवर वार केल्यासारखं होणार आहे, महाराजांच्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढणार नाहीत, उलट विरोधी आणि सत्ताधारी हे दोघेही भ्रष्टाचाराचा विरोध करतील आणि त्याचाच आर्थिक कोथळा काढतील, अशा जोरदार कमेंट्स सध्या नेटकरी करत असल्याचे बघायला मिळत आहे.
काय नेमकं प्रकरण?
अफजलखानाचा (Afzal Khan) कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ब्रिटनने आपणास देण्यास मान्यता दिले आहे. त्याकरिता ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार इंग्लंडला जाणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडबरोबर सामंजस्य करार करणार असल्याचे देखील यावेळी ते म्हणाले आहेत.
Akshay Kumar: वाढदिवशी खिलाडी महाकालच्या चरणी, कुटुंबीयांसह घेतलं दर्शन; Video Viral
अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमधील विक्टोरिया अॅन्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. परंतु आता डिसेंबरपर्यंत ही वाघनखे आपल्या राज्यात आण्यात येणार आहे. शिवरायांनी ज्या दिवशी अफजलखानाचा वध केला, त्यादिवशी ही वाघनखे महाराष्ट्रात आणली जाणार आहे अशी सध्या सुरु आहे. शिवरायांची ही वाघनखे अनमोल ठेवा आहे, ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.