Nana Patekar’s son Malhar responds to Tanushree Dutta, who allegations on father : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता सोशल मीडियावर चर्चेत आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या निधनानंतर वादग्रस्त विधान केल्याने अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत आली होती. नाना पाटेकर यांच्या निधनाचा उल्लेख ‘इव्हिल डेड’ (Evil Dead) असा केला तनुश्रीवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली होती. तर आता यावर थेट नाना पाटेकरांचे पुत्र मल्हार पाटेकर यांनी देखील तनुश्रीला उत्तर दिलं आहे.
प्रहार : न्यायासाठी लढलेली एक ऐतिहासिक लढाई !
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर याने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ता हिच्याकडून नाना पाटेकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचाही उल्लेख केला. संबंधित प्रकरणाबाबत न्यायालयीन स्तरावर स्पष्टता आलेली असतानाही त्यावर पुन्हा पुन्हा चर्चा केली जात असल्याची खंत त्याने व्यक्त केली. तसेच, नाना पाटेकर आणि त्यांच्या पत्नीच्या नात्याविषयी तसेच अभिनेत्याच्या अखेरच्या दिवसांबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या काही दाव्यांनाही त्याने चुकीचे ठरवले.
तनुश्री दत्ताच्या आरोपांवर मल्हारची प्रतिक्रिया काय?
तनुश्री दत्ताकडून नाना पाटेकर यांच्याबाबत करण्यात येणाऱ्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मल्हारने कोणाचंही नाव न घेता आपली भूमिका मांडली. ज्या प्रकरणाचा वारंवार उल्लेख केला जात आहे, त्याबाबत न्यायालयीन प्रक्रियेतून आधीच स्पष्टता मिळाल्याचं त्याने सांगितलं. असं असतानाही या विषयावर पुन्हा चर्चा होत असल्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणावर अधिक बोलण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट करत मल्हारने संबंधित लोकांसाठी केवळ शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याच्या मते, लोकांकडून कितीही दावे केले गेले, तरी सत्य बदलत नाही. नाना पाटेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या चर्चांपेक्षा प्रत्यक्ष नातेसंबंध आणि वस्तुस्थिती समजून घेणं महत्त्वाचं असल्याचा संदेश मल्हारच्या वक्तव्यातून मिळतो.
