Natasa Stankovic-Hardik Pandya: नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) आणि हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) अलीकडेच घटस्फोटाची घोषणा केली होती. त्याआधीही नताशा तिच्या 4 वर्षांच्या मुला अगस्त्यासोबत तिच्या मूळ गावी सर्बियाला गेली होती. घटस्फोटाच्या दीड महिन्यानंतर नताशा पुन्हा मुंबईत परतली आहे. या सगळ्यात आई-वडील विभक्त झाल्यानंतर मंगळवारी या जोडप्याचा मुलगा अगस्त्य (Agastya) पहिल्यांदाच वडिलांच्या घरी पोहोचला होता.
घटस्फोटानंतर नताशा पहिल्यांदाच अगस्त्यासोबत हार्दिकच्या घरी पोहोचली. सोमवारी मुंबईत (Mumbai) परतलेल्या नताशाने मंगळवारी आपल्या मुलाला तिच्या माजी पती आणि क्रिकेटरच्या घरी सोडले होते. हार्दिकची वहिनी पंखुरी शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर अगस्त्यसोबतच्या पुनर्मिलनाची झलक शेअर केली आहे. पंखुरी शर्माने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अगस्त्य त्याच्या मावशीसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पंखुरी तिच्या मांडीवर बसून 4 वर्षाच्या अगस्त्याला पुस्तक वाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पंखुरीचा मुलगाही दिसत आहे.
जुलैमध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती
हार्दिकपासून वेगळे झाल्यानंतर नतासा तिचा मुलगा अगस्त्यला सोबत घेऊन सर्बियाला गेली होती. मे 2020 मध्ये या जोडप्याचे अंतरंग लग्न झाले होते. यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये नताशा आणि हार्दिकने हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पुन्हा लग्न केले. दोघांनी जुलै 2024 मध्ये एक संयुक्त निवेदन जारी करून घटस्फोटाची घोषणा केली. त्यांनी असेही सांगितले की ते त्यांचा मुलगा अगस्त्य सह-पालक असतील.
Natasa Divorce: हार्दिकनंतर नताशकडूनही घटस्फोटाच्या चर्चांना दुजोरा ? म्हणाली, ‘तुझ्या आयुष्यात…’
नताशा-हार्दिकच्या घटस्फोटाचे कारण
नुकतचं टाईम्स नाऊच्या एका रिपोर्टमध्ये नताशा आणि हार्दिकच्या विभक्त होण्याचे कारण समोर आले आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, एका जवळच्या सूत्राने सांगितले की, हार्दिकचा शो ऑफ होता. नताशाला ते आता सहन होत नव्हते. माणूस म्हणून त्यांच्यात खूप मोठा फरक आहे हे त्यांच्या लक्षात आले. अनेक वर्षांपासून नताशाने स्वत:ला क्रिकेटरशी जुळवण्याचा प्रयत्न केला, पण हार्दिकने स्वत:ला बदलले नाही. नताशानेही हार्दिकपासून विभक्त होण्याच्या निर्णयावर पुनर्विचार केला, परंतु जखम इतकी खोल होती की ती तिला सतत दुखत राहिली आणि शेवटी तिला क्रिकेटरपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घ्यावा लागला.