आलियाच्या आरोपांवर Nawazuddin Siddiqui तोडले मौन; म्हणाला, “ती माझ्याकडून महिन्याला…”

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून सतत वाद सुरू आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीची पहिली पत्नी आलिया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सतत व्हिडिओ शेअर करत आहे. यामध्ये नवाज आणि त्याचे कुटुंब तिच्याबरोबर आणि तिच्या मुलांबरोबर किती अमानुष वर्तन करत आहे हे सांगत आहे. आलियाने […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (4)

Nawazuddin Siddiqui

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून सतत वाद सुरू आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीची पहिली पत्नी आलिया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सतत व्हिडिओ शेअर करत आहे. यामध्ये नवाज आणि त्याचे कुटुंब तिच्याबरोबर आणि तिच्या मुलांबरोबर किती अमानुष वर्तन करत आहे हे सांगत आहे. आलियाने नवाजवर खोचक आरोप केले आहेत, यावर आता अभिनेत्याने मौन तोडले आहे. नवाजुद्दीनने सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून या संपूर्ण प्रकरणावर आपले वक्तव्य केले आहे. अनेक वर्षांपासून पत्नीला दरमहा लाखो रुपये देत असल्याचे नवाजने स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणात त्याला ‘वाईट माणूस’ म्हणून सादर केले जात आहे, असंही नवाजुद्दीनने सांगितलं आहे.

नवाजने आपल्या वक्तव्यात सांगितलं आहे, ‘माझ्या मौनामुळे मला संपूर्ण जगासमोर एक वाईट व्यक्ती म्हणून सादर केले जात आहे. पण माझ्या गप्प राहण्याचे कारण म्हणजे कुठेतरी माझी मुलंही हा सगळा तमाशा पाहतील. सोशल मीडियावर प्रेस आणि काही लोक माझ्या चारित्र्य हत्येला मोठ्या थाटामाटात मांडत आहेत. अशा परिस्थितीत मला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. नवाजने ३ पानांत आपले म्हणणे मांडले आहे. त्याने लिहिले की, ‘सर्व प्रथम, मी आणि आलिया अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही. आमचा घटस्फोट झाला आहे, पण आमच्यात समजूत फक्त मुलांसाठी होती.’ दुसऱ्या मुद्द्यात अभिनेता म्हणाला, ‘माझी मुलं गेल्या ४५ दिवसांपासून इथे काय करत आहेत आणि ते त्यांच्या शाळेत का जात नाहीत हे कुणाला माहीत आहे का ? तर रोज मला शाळेतून त्याच्या गैरहजेरीविषयी पत्र येत आहे.

माझ्या मुलांना ४५ दिवसांपासून बंदिवासात ठेवले आहे, ते गेल्या ४५ दिवसांपासून दुबईतील त्यांच्या शाळेत गेले नाहीत. ‘तिने माझ्या मुलांना ४ महिने एकटे सोडले आणि आता त्यांना पैसे मागण्यासाठी येथे बोलावले आहे. गेल्या २ वर्षांपासून दरमहा सरासरी १० लाख रुपये दिले जात आहेत. आणि माझ्या मुलांसह दुबईला जाण्याअगोदर त्यांना दरमहा सुमारे ५ ते ७ लाख रुपये दिले जात होते. या पैशात शाळेची फी, वैद्यकीय खर्च किंवा माझ्या मुलांच्या इतर खर्चाचा समावेश नाही. मी आणखी ३ चित्रपटांना फायनान्स केले आहे, ज्यात मी करोडो रुपये खर्च केले आहेत. हे सर्व यासाठी की तिने स्वतःचे काहीतरी प्रस्थापित करावे आणि स्वतःला सेटल करावे, कारण ती माझ्या मुलांची आई आहे.

Ajay Devgn’s Bholaa : ‘लढाई हौसलोसे जिती जाती है…’ अजय देवगणच्या भोलाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज

मिळालेल्या माहितीनुसार नवाजुद्दीन सिद्दीकीची एकूण संपत्ती सुमारे १३ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ९६ कोटी रुपये आहे. माझ्या मुलांसाठी मी तिला महागड्या कार दिल्या होत्या, पण तिने त्या आपल्या खर्चाकरिता विकल्या. मी माझ्या मुलांसाठी वर्सोवा येथे एक महागडे घर देखील घेतले आहे, जे आलियाच्या नावावर आहे कारण मुले लहान आहेत. मी माझ्या मुलांसाठी दुबईमध्ये एक घरही विकत घेतले आहे. जेणेकरून ते तिथे निवांत राहू शकणार आहेत. फक्त जास्त पैशांची मागणी करण्याच्या उद्देशाने ती माझ्यावर आणि माझ्या आईवर अनेक खटले दाखल करत आहेत.

बरं झालं ओळखलं तरी, सनी देओलच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

याआधी देखील तिने मागितलेली किंमत मिळाल्यावर तिने केस मागे घेतली. आलियाने नुकताच एक व्हिडिओ शेअर करत मोठा दावा केला आहे की, तिला आणि तिच्या मुलांना नवाजच्या बंगल्यातून मध्यरात्री बाहेर काढण्यात आले. तिच्याकडे फक्त ८१ रुपये शिल्लक आहेत. आणि अशा परिस्थितीत तिने मुलांसह कुठे जायचे. या व्हिडिओत नवाजची मुलगीही रडताना दिसत आहे. दरम्यान, नवाजने त्याविषयी पुढे लिहिले की, ‘जेव्हाही माझी मुलं सुट्टीत भारतात येतात, तेव्हा ते आजीसोबत राहतात. त्यांना कोणी कसे बाहेर काढू शकेल ? त्यावेळी मी घरीही नव्हतो. ती प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचे व्हिडिओ बनवते, तिला घरातून बाहेर काढताना तिने व्हिडिओ का बनवला नाही ? असा सवाल त्याने यावेळी केला.

‘ती माझ्या मुलांना या संपूर्ण नाटकात ओढत आहे, कारण तिला मला ब्लॅकमेल करायचे आहे. तिला माझे करिअर बरबाद करायचे आहे. दरम्यान, अभिनेत्याने लास्टच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, या जगात कोणतेही पालक त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे आणि त्यांच्या भविष्याचे नुकसान करू इच्छित नाही. ते नेहमी आपल्या मुलांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. आज मी जे काही कमावत आहे, ते फक्त माझ्या मुलांचे आहे आणि ते कोणीही बदलू शकणार नाही.

Exit mobile version