Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दिन सिद्दिकीने (Nawazuddin Siddiqui ) बॉलीवूडमध्ये (Bollywood) आपले मोठे स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दिन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सिनेमासृष्टीमध्ये कोणीही गॉडफादर नाही, आपल्या अभिनयाच्या जोरावर नवाजने कमी वेळात अनेक बड्या स्टार्सबरोबर काम केले आहे. (Shah Rukh Khan) किंग खानसोबत ‘रईस’, भाईजानसोबत (Salman Khan) ‘बजरंगी भाईजान’, तर ‘तलाश’ सिनेमात नवाजुद्दिनने आमिर खानबरोबर काम केले आहे.
नवाजुद्दिन त्याच्या प्रत्येक पात्रामध्ये जीव ओतत असल्याचे दिसून येतो. अनेक सिनेमामध्ये साहाय्यक भूमिका केल्यावर आता त्याने मोठ्या भूमिका करायला सुरुवात केली. सिनेमातील मुख्य भूमिकेविषयी नवाजुद्दीन सिद्दिकीने मोठी घोषणा केली आहे. एवढंच नाही तर भाईजान आणि किंग खानसोबत काम करण्याबाबत देखील नवाजुद्दीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
तसेच नवाजुद्दीन सिद्दिकी पुढे म्हणाला की, “असे नाही की मला भाईजान किंवा किंग खानसोबत काम करायचे नाही. जर मला मोठ्या सिनेमात सशक्त भूमिका मिळाली, तर मी अगोदर प्रमाणेच काम करायला आवडणार आहे. मात्र सिनेमात मुख्य भूमिका आणि साहाय्यक भूमिका यामधील अंतर खूप महत्त्वाचे असणार आहे. युरोप किंवा हॉलीवूडमध्ये यावरून काही फरक पडत नाही, पण इथे साहाय्यक कलाकारांना छोट्या भूमिका मिळत असतात.
मी कसा तरी त्यामधून सुटलो आणि मला त्याची पुनरावृत्ती पुन्हा करायची नाही. आता मी फक्त मुख्य भूमिका साकारणार आहे. यासाठी मला स्वतःच्या खिशातून सिनेमासाठी पैसे द्यावे लागणार आहे. तसेच नवाजुद्दीन पुढे म्हणाला की, त्याचा अर्थ असा नाही की, तो फक्त आणि फक्त हिरोची भूमिका करणार आहे. तो म्हणाला, ‘जसे मी ‘रईस’मध्ये काम केले होते.
‘द केरळ स्टोरी’ची सहाव्या दिवशीही छप्पर फाड कमाई, कमावले ‘इतके’ कोटी
माझी भूमिका किंग खानच्या विरुद्ध होती आणि ती एक दमदार भूमिकेत होती. मी ‘हिरोपंती-२’ केला, जरी तो सिनेमा चालला नाही, पण त्यात माझी मुख्य भूमिका होती. आता मला मोठ्या सिनेमामध्ये अशा भूमिका करायच्या आहेत. नवाजुद्दीन सिद्दिकी नुकताच ‘अफवा’ या सिनेमात दिसला होता. आता तो ‘जोगिरा सा रा रा रा’ या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत नेहा शर्मा मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. संजय मिश्रा, महाक्षय चक्रवर्ती आणि झरीना वहाब हे देखील या सिनेमाचा एक भाग आहेत. हा सिनेमा १२ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.