‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; दुसऱ्याच दिवशी जगभरातील कमाई 10.3 कोटींवर

Nayyi Navelli BO Report : फॅन्टसी आणि कौटुंबिक मनोरंजनाचा अनोखा संगम साधणाऱ्या ‘नई नवेली’ला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.

Nayi Naveli

Nayi Naveli

Nayyi Navelli BO Report : यामी गौतमच्या मोठ्या पडद्यावरील धमाकेदार कामगिरीला प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी जगभरात 4.6 कोटींची ग्रॉस कमाई करत दमदार सुरुवात केल्यानंतर, ‘नई नवेली’ने दुसऱ्या दिवशी 5.7 कोटींची ग्रॉस कमाई केली आहे. यासह चित्रपटाची जगभरातील एकूण ग्रॉस बॉक्स ऑफिस कमाई (GBOC) 10.3 कोटींवर पोहोचली आहे. कमाईत सातत्याने होत असलेली वाढ पाहता, दसऱ्याच्या सणानिमित्त संपूर्ण कुटुंबासोबत मोठ्या पडद्यावर चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांची पसंती मिळवत हा चित्रपट आगामी आठवड्यातही दमदार कामगिरी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

फॅन्टसी आणि कौटुंबिक मनोरंजनाचा अनोखा संगम साधणाऱ्या ‘नई नवेली’ला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. प्राचीन महाकाव्याची प्रेरणा, अ‍ॅक्शन आणि हृदयस्पर्शी कौटुंबिक क्षण यांची सांगड घालत हा चित्रपट एक वेगळा देसी अनुभव देतो. यामी गौतम एका उत्साही कलाकारांच्या संचासह आवस्थी कुटुंबाच्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जाते. चित्रपटातील हटके व्यक्तिरेखा, अनपेक्षित वळणं आणि चांगल्या-वाईटामधील रंजक संघर्ष यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक मनोरंजक सिनेमॅटिक अनुभव ठरत असून, सणासुदीच्या काळात त्याच्या लोकप्रियतेत भर पडत आहे.

दुसऱ्या दिवशीच्या कमाईतील वाढीमुळे चित्रपटाच्या थिएटरमधील प्रवासाबाबतचा उत्साह आणखी वाढला आहे. चित्रपटाची अनोखी कथा आणि यामी गौतमचा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आगामी आठवड्यात अधिकाधिक कुटुंबांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्याची क्षमता ‘नई नवेली’मध्ये आहे.

बालाजी मोहन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिमांशू शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी लेखन केले आहे. चित्रपटात आदिनाथ एम. कोठारे, अनुराग ठाकूर, सुनीता राजवर, मीता वशिष्ठ, आदित्य कुलश्रेष्ठ, सुस्मिता मुखर्जी आणि प्रतीक पचौरी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसत आहेत. आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, संगीताची जबाबदारी जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी सांभाळली आहे.

Exit mobile version