CBFC च्या चित्रपट प्रमाणपत्रासाठी नव्या मार्गदर्शक सूचना; ड्रग्जच्या दृश्यांवर आता इशारा अनिवार्य

CBFC   : चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देणाऱ्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) कार्यपद्धतीसंदर्भात

CBFC

CBFC

CBFC   : चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देणाऱ्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) कार्यपद्धतीसंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जवळपास 35 वर्षांनंतर चित्रपट प्रमाणनासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नव्याने बदल करण्यात आले आहेत. मात्र, 1991 मधील बहुतांश तरतुदी कायम ठेवण्यात आल्या आहेत. या नव्या मार्गदर्शक सूचनांमधील सर्वात महत्त्वाचा बदल अमली पदार्थांशी संबंधित दृश्यांबाबत आहे. चित्रपटात नार्कोटिक ड्रग्ज किंवा सायकोट्रॉपिक पदार्थांचा वापर, सेवन किंवा तस्करी दाखवण्यात आली असल्यास संबंधित दृश्यांसोबत आता वैधानिक इशारा देणे आवश्यक असेल.

या दृश्यांवर “Illicit Narcotics Destroy Health and Guarantees Imprisonment, Say No to Drugs” असा इशारा देण्यात येणार आहे.

UA प्रमाणपत्राच्या वयोमर्यादा स्पष्ट

नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये UA प्रमाणपत्राअंतर्गत असलेल्या वयोमर्यादांचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार

– UA 7+ — 7 वर्षांखालील मुलांसाठी पालकांचे मार्गदर्शन आवश्यक
– UA 13+ — 13 वर्षांखालील मुलांसाठी पालकांचे मार्गदर्शन आवश्यक
– UA 16+ — 16 वर्षांखालील मुलांसाठी पालकांचे मार्गदर्शन आवश्यक

ही वयोआधारित वर्गवारी Cinematograph (Certification) Rules, 2024 अंतर्गत आधीच लागू करण्यात आली आहे. आता नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये तिचा स्पष्ट समावेश करण्यात आला आहे.

हिंसा आणि गुन्हेगारीच्या चित्रणाबाबतही नियम कायम

CBFC च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये हिंसा, गुन्हेगारी आणि समाजविघातक कृत्यांच्या चित्रणासंदर्भातील पूर्वीच्या तरतुदी कायम आहेत. समाजविघातक कृत्ये किंवा हिंसेचे गौरवीकरण अथवा समर्थन होणार नाही, तसेच गुन्हेगारांची कार्यपद्धती किंवा गुन्हा करण्यास प्रवृत्त करणारे दृश्य अथवा संवाद दाखवण्याबाबत CBFCकडून विशेष विचार केला जाईल. याशिवाय देशाची सार्वभौमता व अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, परदेशी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध, सभ्यता व नैतिकता, बदनामी आणि न्यायालयाचा अवमान यांसारख्या मुद्द्यांशी संबंधित पूर्वीच्या मार्गदर्शक सूचनाही कायम आहेत.

IPL 2027 ‘या’ दिवशी होणार लिलाव; खेळाडूंवर लागणार कोट्यवधी रुपयांची बोली-

चित्रपट निर्मात्यांसाठी काय बदलणार?

नव्या नियमांमुळे चित्रपट निर्मात्यांना विशेषतः ड्रग्जशी संबंधित दृश्ये आणि त्यावरील वैधानिक इशारे याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर UA प्रमाणपत्राच्या नव्या वयोवर्गांचा वापर अधिक स्पष्टपणे केला जाणार आहे. दरम्यान, CBFCने स्पष्ट केले आहे की त्याचे अधिकार मुख्यतः सार्वजनिक प्रदर्शनासाठी असलेल्या चित्रपटांच्या प्रमाणनापुरते मर्यादित आहेत. OTT प्लॅटफॉर्मवरील सामग्री CBFCच्या प्रमाणनाच्या कक्षेत येत नाही; तिच्यासाठी स्वतंत्र नियामक चौकट लागू आहे.

Exit mobile version