Bigg Boss Marathi New Season Day 28 : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 5) यंदाचा सीझन खूपच जोरदार चर्चेत आला आहे. (Bigg Boss Marathi ) बिग बॉसच्या घरातील गणित दिवसेंदिवस बदलत असल्याचं बघायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’चा चौथा आठवडा खूपच धमाकेदार ठरला. घरातील सदस्यांमध्ये वाद, रडारडी, भांडणं, बघायला मिळाली. बिग बॉस मराठीच्या घरातील काही सदस्यांचं खूप कौतुक झालं, तर काहींना मात्र नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल देखील केले आहे. सध्या यंदाच्या सीझनमध्ये निक्की तांबोळी (Nikki Tamboli) जोरदार चर्चेत राहिली, त्याच कारण म्हणजे तिच्या ‘बाईईई….’ या बोलण्यावरून, ती सतत घरात बोलताना ‘बाईईई…., बाईईई….’ असं बोलत असते. आणि तिला तेवढा एकच शब्द येत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्याचीच भुरळ आता पुणे वाहतूक (Pune Police) पोलिसांना पडल्याचे दिसत आहे.
बाईईई!!! हे शोभतं का?
पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळले नाही तर कसं चालेल? #नियम_म्हणजे_नियम #शहाणे_व्हा pic.twitter.com/tAP5D1VG32
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) August 23, 2024
बाईईई!!! हे शोभतं का? पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळले नाही तर कसं चालेल #नियम_म्हणजे_नियम #शहाणे_व्हा, असे कॅप्शन देऊन पुणे पोलिसांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये नेमकं काय आहे, चला तर मग पाहूया… गाडीत बसल्यावर सीटबेल्ट लावायला विसरता? बाईईई!!!, बाईक चालवताना हेल्मेट नाही घालत ? बाईईई!!!, वेगाने वाहन चालवता ? बाईईई!!!, सिग्नल तोडता ?बाईईई!!!, असा एक नियमांबाबतचा व्हिडिओ पुणे पोलिसांनी शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाल्याचे दिसत आहे.
सध्या निक्की तांबोळीच्या मराठीची चाहत्यांमध्ये आणि स्पर्धकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्की सतत ‘बाई बाई’ बोलताना पाहायला मिळत असते. ‘बाई बाई’ म्हणातानाचा तिचा गोड अंदाज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निक्कीचा हा गोड अंदाज प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. तिच्या ‘बाई बाई’ ह्या डायलॉगवर वर्षा उसगांवकर म्हणतात, “तेवढाच एक मराठी शब्द चांगला येतो हिला.”
Bigg Boss Marathi : भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही; रितेश भाऊनी जान्हवीला दाखवली तिची जागा
कलर्स मराठीने हा मजेशीर व्हिडिओ त्यांच्या सोशल मिडिया हँडलवर शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून गेल्या काही दिवसांत निक्कीने बिग बॉसच्या घरात जितक्या वेळा ‘बाई बाई’ हा डायलॉग म्हटला तितक्या वेळचा भाग एडिट करून व्हिडिओ क्रिएट करण्यात आला आहे. “सगळे हसतात हिच्यापायी, बोलते सारखी बाई बाई…” अशी सोशल मीडियावर टॅगलाईन देऊन निक्की तांबोळीचा हा मजेशीर व्हिडिओ व्हायरल केला जात आहे.