Download App

सर्कस पाहून करिअरची निवड केली, निलेश साबळेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

Nilesh Sable Interview : गेल्या 10 वर्ष ‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमाने प्रेक्षकांचं मनोरंज करणारे डॉ. निलेश साबळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं

Image Credit: letsupp

Nilesh Sable Interview : गेल्या 10 वर्ष ‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमाने प्रेक्षकांचं मनोरंज करणारे डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंज करण्यासाठी नवीन कार्यक्रम घेऊन येत आहे. डॉ. निलेश साबळे आता ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे.

सध्या या कार्यक्रमासाठी नवीन प्रोमो शूट करण्यात आला आहे. या निमित्त डॉ. निलेश साबळे आणि त्यांच्या टीमने letsupp मराठीशी गप्पा मारले. letsupp मराठीशी बोलताना त्यांनी लहानपणात सर्कसपाहून कशा पद्धतीने या क्षेत्राची निवड केली तो किस्सा देखील सांगितला.

letsupp मराठीशी बोलताना डॉ. निलेश साबळे म्हणाले, मला लहानपणी माझे वडील सर्कस पाहण्यासाठी घेऊन गेले होते तेव्हा मला सर्कसमध्ये प्राणी आवडले मात्र सर्वात जास्त दोन लहान जोकर आवडले. ज्या पद्धतीने ते लोकांना हसवत होते त्यांना पाहून मी देखील या क्षेत्राचा करिअर म्हणून निवड करण्याचा निश्चित केला. त्यावेळी सासवडमध्ये (Saswad) एक महिण्यासाठी सर्कस आली होती. एकदा मी बाहेर फिरत होतो तेव्हा मला ते दोन जोकर रस्त्यावर दिसले. मी त्यांच्या पाठीमागे फिरत होतो तेव्हा त्यांनी मला थांबून विचारले, तू आमच्या पाठीमागे का ? येत आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं मला तुमच्यासोबत काम करायचे आहे. तेव्हा त्यांनी तू अभ्यास कर आणि मोठा झाल्यानंतर सकर्समध्ये काम कर असं म्हटले होते. त्यानंतर मी निश्चित केला होता की मला सर्कसमध्येच काम करायचा आहे. आज देवाने मला इतकी मोठी सर्कस दिली असं letsupp मराठीशी बोलताना डॉ. निलेश साबळे म्हणाले.

‘गाडायला आणि वाकायलाही ताकद लागते’,नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला

इतक्या वर्ष तुमची विनोदाची पातळी कशी घसरली नाही? असं त्यांना विचारल्यानंतर डॉ. निलेश साबळे म्हणाले, माझ्या घरात देखील आई- वडील आहे. माझी पत्नी आहे आणि 3 वर्षांची मुलगी आहे. जेव्हा ते लोक माझा कार्यक्रम पाहतात जेव्हा त्यांना कार्यक्रम आवडेल तेव्हाच राज्यातील जनतेला माझा कार्यक्रम आवडेल ही गोष्ट लक्षात घेऊन मी काम करतो,असं ते म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज