Download App

Nitish Bhardwaj : IAS पत्नीविरोधात महाभारतातील श्रीकृष्ण पोलिसांत; मुलींच्या अपहरणाचा केला आरोप

  • Written By: Last Updated:

Nitish Bhardwaj : रामानंद सागर यांच्या महाभारतातील कृष्ण म्हणजे अभिनेते नितिश भारद्वाज (Nitish Bhardwaj) सर्वांच्याच परिचयाचे आहेत. मात्र यावेळी ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणजे भारद्वाज यांनी त्यांच्या पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दाखली केली आहे.

Lok Sabha Election : राजकारणातील स्टार्स! काहींचं ‘पॉलिटिक्स’ हिट तर काहींचं करिअरच ‘ब्रेक’

आपली पत्नी आपल्या मानसिक त्रास देत असल्याची तक्रार भारद्वाज यांनी केली आहे. ही तक्रार भोपाल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांची पत्नी एक आयएएस अधिकारी आहे. स्मिता भारद्वाज असं त्यांच्या पत्नीच नाव आहे. त्या राज्य मानव आयोगामध्ये कार्यरत असून त्या दोघांचा कोर्टात वाद सुरू आहे. त्यांच्या विरोधात पती नितिश यांनी मुलींना भेटू न दिल्याचा आणि त्यांचं अपहरण केल्याचा आरोप केला आहे.

Shreyas Talpade: ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने ‘ही अनोखी गाठ’मधील ‘मी रानभर’ प्रेमगीत रिलीज

नितिश आणि स्मिता यांचा विवाह 14 मार्च2009 ला झाला होता. नितिश आणि स्मिता या दोघांचाही हा दुसरा विवाह होता. काही मित्रांच्या ओळखीने या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. त्या दोघांना दोन जुळ्या मुली आहेत. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्याने वाद होत असल्याने त्या दोघांचा कोर्टात वाद सुरू आहे.

या दरम्यान हे दोघे वेगळे राहत असून कोर्टाने स्मिता यांना मुलींना नितिशला भेटू देण्यासाठी आदेश देखील दिलेले आहेत. मात्र गेल्या चार वर्षांपासून आपण आपल्या मुलींना भेटलो नसल्याचं नितिश यांनी सांगितलं आहे. तसेच स्मिताने त्यांचं अपहरण केलं असल्याचा आरोप देखील नितिश यांनी केला आहे. तर पत्नीला मुलींबाबत विचारले असता ती कोणतेही उत्तर देत नाही. तसेच या दाम्पत्याच्या वादावर मुंबईमध्ये केस सुरू आहे.

follow us