प्राईम व्हिडिओकडून करण्यात आली ‘120 बहादुर’ च्या जागतिक स्ट्रीमिंग प्रीमियरची अधिकृत घोषणा

भारतीय लष्कराच्या इतिहासातील अतिशय शौर्यपूर्ण आणि प्रेरक अध्यायावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरणार.

Untitled Design   2026 01 17T120342.599

Untitled Design 2026 01 17T120342.599

global streaming premiere of ‘120 Bahadur’ : भारताची सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन सेवा आलेल्या प्राईम व्हिडिओने आज प्रेरणादायी युद्धनाट्य ‘120 बहादुर’ च्या जागतिक स्ट्रीमिंग प्रीमियरची अधिकृत घोषणा केली आहे. भारतीय लष्कराच्या इतिहासातील अतिशय शौर्यपूर्ण आणि प्रेरक अध्यायावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरणार आहे. दिग्दर्शक रजनीश ‘रेझी’ घई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर (एक्सेल एंटरटेनमेंट) तसेच अमित चंद्रा (ट्रिगर हॅपी स्टुडिओज) यांनी केली आहे. समीक्षकांकडून प्रशंसित ठरलेल्या ‘120 बहादुर’ या चित्रपटात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत झळकत असून, त्यांच्या सोबत राशी खन्ना, स्पर्श वालिया, विवान भटेना आणि एजाज खान हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

धैर्य, बंधुभाव आणि अढळ निर्धार यांचे प्रभावी दर्शन घडवणारा हा चित्रपट, 13 कुमाऊँ रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांच्या असामान्य शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाला भावपूर्ण आदरांजली वाहतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही माघार न घेता लढा देणाऱ्या या सैनिकांची कथा प्रेक्षकांना देशभक्ती आणि अभिमानाची जाणीव करून देते. लडाखमधील रेझांग ला खिंडीत घडलेल्या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘120 बहादुर’ हा चित्रपट, रेझांग ला लढाईतून प्रेरणा घेतो—जिथे अतुलनीय शौर्य, शिस्त आणि बलिदानाने इतिहास घडवला. बंदुका, संगीन (बायोनेट्स) आणि हातोहात लढाई करत दिलेल्या अखेरच्या झुंजीचे अत्यंत प्रभावी आणि वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते.

पुण्यात पती-पत्नी, सख्ख्या भावांसह सासू-सुना देखील महापालिका सभागृहात दिसणार एकत्र

युद्धाच्या रणांगणावर सैनिकांमधील अतूट बंधुभाव, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रासाठी प्राण अर्पण करण्याची तयारी यांचे हृदयस्पर्शी दर्शन घडवत, ‘120 बहादुर’ प्रेक्षकांना एक अविस्मरणीय आणि भावनात्मक सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन देतो. ‘120 बहादुर’ हा चित्रपट आता भारतासह जगभरातील 200 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असून, देशभक्ती, शौर्य आणि बलिदानाची गाथा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Exit mobile version