Valentine Day निमित्त ‘एक फुल’, ‘टीडीएम’चं गाणं प्रेक्षकांसमोर

मुंबई : मराठीमध्ये नेहमीच आगळेवेगळे विषय असणारे चित्रपट तयार केले जातात. यामध्ये आता भर पडली आहे ती ‘टीडीएम’ चित्रपटाची.या चित्रपटाचं दिग्दर्शन भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी केले आहे. ते बबन, ख्वाडा या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. नुकतंच या चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं व्हायरल झालं असून, प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत ‘टीडीएम’ […]

Untitled Design   2023 02 07T161927.955

Untitled Design 2023 02 07T161927.955

मुंबई : मराठीमध्ये नेहमीच आगळेवेगळे विषय असणारे चित्रपट तयार केले जातात. यामध्ये आता भर पडली आहे ती ‘टीडीएम’ चित्रपटाची.या चित्रपटाचं दिग्दर्शन भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी केले आहे. ते बबन, ख्वाडा या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत.

नुकतंच या चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं व्हायरल झालं असून, प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत ‘टीडीएम’ चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं प्रेक्षकांसमोर आलं आहे.

या गाण्याला संगीत दिले आहे ते रोहित नागभिडे यांनी. तर लेखन विनायक पवार आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रियंका बर्वे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी हे गाणं गायलं आहे. ‘टीडीएम’ चित्रपटातील नवोदित जोडगोळी अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी हे या गाण्यावर थिरकलेले पाहायला मिळत आहेत.

हे गाणं व्हॅलेंटाईन डे निमित्त रीलिज करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेमीयुगुलांना ही पर्वणी आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत ‘टीडीएम’ चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं प्रेक्षकांसमोर आलं आहे. लवकरात लवकर चित्रपटातील इतर गाणी ही ठेका धरायला लावण्यास सज्ज होणार आहेत.

Exit mobile version