Oscar 2026 Winners List : जागतिक चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा 98 वा वार्षिक ‘अॅकॅडमी अवॉर्ड्स’ (Oscars 2026) सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यात दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांच्या ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ (One Battle After Another) या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह एकूण 6 पुरस्कारांवर आपली मोहर उमटवलीय. तर अभिनयात मायकेल बी. जॉर्डन आणि जेसी बकलेंना ऑस्कर मिळाला आहे.
‘हॅम्नेट’ (Hamnet) चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी जेसी बकले हिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला. ऑस्कर जिंकणारी ती पहिली आयरिश महिला ठरली आहे. अनुभवी अभिनेता शॉन पेन यांनी ‘वन बॅटल आफ्टर अनदर’साठी ‘सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता’ म्हणून कारकिर्दीतील तिसरे ऑस्कर पटकावले आहे. जगभरातील सिनेप्रेमींचे लक्ष लागून असलेल्या या सोहळ्याने यंदाही अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. ‘वन बॅटल आफ्टर अनदर’च्या विजयाने पॉल थॉमस अँडरसन यांच्या दिग्दर्शनावर पुन्हा एकदा मोहोर उमटवली आहे.
’सिनर्स’चा ऐतिहासिक विक्रमी प्रवास
रायन कुगलर यांच्या ‘सिनर्स’ या चित्रपटाने ऑस्करच्या इतिहासात सर्वाधिक 16 नामांकने मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला. जरी या चित्रपटाने चार पुरस्कार जिंकले असले, तरी तांत्रिक श्रेणींमध्ये या चित्रपटाचे वर्चस्व दिसून आला आह.
सर्वोत्कृष्ट कास्टिंगचा पुरक्कारही वन बॅटल आफ्टर अनदरला
यंदापासून ‘सर्वोत्कृष्ट कास्टिंग’ (Best Casting) ही नवीन श्रेणी सुरू करण्यात आलीय. हा पहिला ऐतिहासिक पुरस्कार कॅसांड्रा कुलुकुंडिस (वन बॅटल आफ्टर अनदर) यांनी पटकावलाय. ‘के-पॉप डेमन हंटर्स’ चित्रपटातील ‘गोल्डन’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँगचा पुरस्कार जिंकत नवा इतिहास रचलाय.
भारतीय कलाकारांना श्रद्धांजली
‘इन मेमोरिअम’ विभागात भारतीय सिनेसृष्टीचे दिग्गज धर्मेंद्र, मनोज कुमार आणि बी. सरोजा देवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अभिनेत्री प्रियांका चोप्राने Presenter म्हणून हजेरी लावली
ऑस्कर विजेते यादी
सर्वोत्तम चित्रपट: वन बॅटल आफ्टर अदर
सर्वोत्तम दिग्दर्शक: पॉल थॉमस अँडरसन – वन बॅटल आफ्टर अदर
सर्वोत्तम अभिनेता: मायकेल बी. जॉर्डन – सिन्सर्स
सर्वोत्तम अभिनेत्री: जेसी बकले –हॅमनेट
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता: शॉन पेन -वन बॅटल आफ्टर अदर
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री: एमी मॅडिगन – वेपन्स
सर्वोत्तम मूळ पटकथा : रायन कूगलर -सिन्सर्स
सर्वोत्तम रूपांतरित पटकथा: पॉल थॉमस अँडरसन — वन बॅटल आफ्टर अदर
सर्वोत्तम अॅनिमेटेड चित्रपट : केपॉप डेमन हंटर्स
सर्वोत्तम चित्रपट संपादन: वन बॅटल आफ्टर अदर
सर्वोत्तम निर्मिती डिझाइन: फ्रँकेन्स्टाईन
