Download App

ऑस्कर पुरस्कारांमध्ये एड्रियन ब्रॉडीचा दबदबा, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड तर मिकी मॅडिसन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Oscar Awards 2025 : 'द ब्रुटालिस्ट' या चित्रपटासाठी एड्रियन ब्रॉडीमची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. ऑस्कर 2025 लॉस अँजेलिस

  • Written By: Last Updated:

Oscar Awards 2025 : ऑस्कर 2025 मध्ये ‘द ब्रुटालिस्ट’ (The Brutalist) या चित्रपटासाठी एड्रियन ब्रॉडीमची (Adrien Brody) सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. तर ‘अनोरा’ (Anora) या चित्रपटासाठी मिकी मॅडिसनने (Mickey Madison) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार जिंकला आहे. तसेच अनोरा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार मिळाला आहे. ऑस्कर 2025 लॉस अँजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यंदा या पुरस्कारचे सुत्रसंचालन प्रसिद्ध कॉमेडियन आणि पॉडकास्टर कॉनन ओब्रायन (Conan O’Brien) करत आहे.

याचबरोबर ‘आय एम स्टिल हिअर ब्राझील’ ची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म म्हणून निवड करण्यात आली आहे. तर 2025 च्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये शॉन बेकरची सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून निवड झाली. शॉन बेकरला (Sean Baker) ‘अनोरा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला आहे.

तर दुसरीकडे ऑस्कर पुरस्कार विजेत्यांच्या शर्यतीत गुनीत मोंगा यांचा ‘अनुजा’ हा चित्रपटही समाविष्ट होता. या चित्रपटाला लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीत नामांकन मिळाले होते मात्र या कॅटेगरीत आय एम नॉट अ रोबोटची सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म म्हणून निवड करण्यात आली. ‘अनुजा’ चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्रा आणि गुनीत मोंगा यांनी केली होती.

कॉनन ओ’ब्रायनने ऑस्कर होस्ट म्हणून रचला इतिहास

ऑस्कर अवॉर्ड्स शोमध्ये कॉनन ओ’ब्रायनने पहिल्यांदाच ऑस्कर होस्ट म्हणून इतिहास रचला आहे. ऑस्कर अवॉर्ड्स 2025 अनेक देशांमध्ये पाहिला जात असल्याने त्याने या शोची सुरुवात , इंग्रजी व्यतिरिक्त, स्पॅनिश, हिंदी, चिनी आणि इतर भाषांमध्ये केली. यावेळी होस्ट कोनन ओ’ब्रायन हिंदीत म्हणाला की, “नमस्कार. भारतात सध्या सकाळ आहे, त्यामुळे मला आशा आहे की तुम्ही नाश्ता करताना 97 व्या अकादमी पुरस्कारांचा आनंद घेत असाल.” कोनन ओ’ब्रायन हे अकादमी पुरस्कारांच्या मंचावर हिंदीत बोलणारा पहिला हॉस्ट आहे.

वेळीच सावध व्हा! बेडवर पडताच 5 मिनिटांत झोप लागते का? होवू शकतो गंभीर आजार…

कोनन ओ’ब्रायन कोण आहे?

कॉनन क्रिस्टोफर ओ’ब्रायन हा एक अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट, विनोदी कलाकार, अभिनेता, लेखक आणि निर्माता आहे. तो NBC टेलिव्हिजन नेटवर्कवरील लेट नाईट विथ कॉनन ओ’ब्रायन (1993-2009) आणि द टुनाइट शो विथ कॉनन ओ’ब्रायन (2009-2010) आणि केबल चॅनल TBS वर कॉनन (2010-2021) या कार्यक्रमांपासून सुरुवात करून रात्रीच्या वेळी होणाऱ्या टॉक शोचे आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

follow us