Oscars 2024: ऑस्कर (Oscar) या सन्मानित पुरस्कारासाठी भारताकडून एका मल्याळम सिनेमाची निवड केली आहे. (Kerala Flood) फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून अधिकृत एण्ट्री म्हणून २०१८ सालीचा मल्याळम सिनेमाची (Malayalam film) निवड करण्यात आली आहे. (Oscar Awards) टॉविनो थॉमसने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्याचे बघायला मिळाले होते.
२०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरावर आधारित या सिनेमाची स्टोरी आहे. गेल्या काही वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘RRR’ या तेलुगू सिनेमाचा चांगलीच चर्चा रानगळी होती. यामधील ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता. ऑस्करकरिता याअगोदर देशाकडून गली बॉय, लास्ट फिल्म शो, पेबल्स आणि जलीकट्टू यांसारख्या सुपरहिट सिनेमांना अधिकृत एण्ट्री देण्यात आली होती.
तसेच आतापर्यंत फक्त तीन भारतीय सिनेमाना ऑस्करमध्ये नामांकन देण्यात आले आहे. तसेच यामध्ये मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान या सिनेमाचा देखील समावेश आहे. तर ‘रायटिंग विथ फायर’ आणि ‘ऑल दॅट ब्रीद्स’ या दोन भारतीय माहितीपटांना देखील नामांकन डेन्ह्यात आले आहे. गेल्या वर्षी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा (शॉर्ट) ऑस्कर पुरस्कार देखील देण्यात आला होता होता.
Naseeruddin Shah: वडील मुलांच्या नात्याबद्दल नसीरुद्दीन शाहचे भाष्य; म्हणाले, ‘आयुष्यातील खलनायक…”
२०१८ मधील या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता टॉविनो याना देखील ऑस्कर एण्ट्रीबद्दल प्रतिक्रिया दिल्याचे बघायला मिळाले आहे. तसेच तो यावर म्हणाला आहे की, ऑस्करसाठी देशाकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड होणं ही आमच्यासाठी खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. अभिनेता म्हणून केवळ माझ्यासाठी नाही तर संपूर्ण टीमकरिता हा खूपच अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. २०१८ या सिनेमातून आम्ही प्रत्येकाला सांगण्यात आले आहे की, प्रत्येक विध्वंसाच्या शेवटी नेहमी एक आशेचा किरण असणार आहे.
तसेच २०१८ या सिनेमाला ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडण्याच्या अगोदर ‘द केरळ स्टोरी’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’, ‘वाळवी’, ‘बलगम’, ’१६ ऑगस्ट’ यांसारख्या २२ सिनेमाबद्दल विचार करण्यात आला होता. या २२ सिनेमापैकी ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ या सिनेमाने धुमाकूळ गघाटाला आहे. या सिनेमात टॉविनो थॉमसबरोबर कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांच्या देखील मुख्य भूमिका असल्याची माहिती देण्यात आली आहे.