मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut)सोशल मीडियावर पाठलाग करणाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कंगनाने याआधीच माझा कोणीतरी पाठलाग करतंय, माझा व्हॉट्सअॅप डेटा लीक होऊ शकतो, असा आरोप केला होता, त्यानंतर आता तिने पाठलाग करणाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकीच दिली आहे.
तसेच माझ्या नादाला न लागण्याचा इशाराही तिने दिला आहे. मी वेडी आहे हे तुम्हाला माहित आहे, पण मी किती मोठी वेडी आहे, हे तुम्हाला आणखी माहित नाही. त्यामुळे चंगू-मंगू गॅंगने लवकरात लवकर सुधारावं, नाहीतर तुमच्या घरात घूसुन मारणार असल्याची ताकीदच कंगनाने दिलीय. याबाबत तिने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरुन एक पोस्ट केलीय.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कोणत्याही विषयांवर बिनधास्तपणे आपले मत मांडत असते. तिची विधानं किंवा सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा वाद निर्माण होतात. अनेकदा यामुळे तिला ट्रोलदेखील व्हावं लागलं आहे.
दरम्यान, कंगनाच्या या पोस्टमध्ये तिने कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी तिने कुणावर निशाणा साधलाय, हे सगळ्यांना कळले आहे. काही दिवसांपूर्वीच तिने शाहरुख खानच्या पठाण सिनेमावर टीका केली होती. लोकांना पठाणच आवडतो, असे तिने म्हटले होते. तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं.
गेल्या वर्षी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या वेळी तिचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. आगामी काळात तिचा Emergency हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) यांनी लावलेल्या आणीबाणीवर (Emergency) हा सिनेमा आधारित असणार आहे. सिनेमात कंगना स्वत: इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान, सारख्या कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असलेली अभिनेत्री कंगनाने दिलेल्या धमकीनंतर आता पुढे ती काय करणार? कंगनाचा पाठलाग करणारी व्यक्ती पाठलाग बंद करणार का? की आणखी कोणत्या नव्या वादाला तोंड फुटणार हे येणारा काळच ठरवणार आहे.