दुसऱ्या आठवड्यात “पाच फुटाचा बच्चन’ची जोरदार उसळी, येत्या आठवड्यात अमेरिकेत ‘पाच फुटाच्या बच्चन’चे सीमोल्लंघन

त्याच सोबत येत्या आठवड्यात 'बच्चन'चे अमेरिकेत सीमोल्लंघन होणार आहे. त्यामुळे परदेशी प्रेक्षकांपर्यंत मराठी मातीचा सुगंध पोचणार आहे.

Untitled Design   2026 10 19T125811.298

Untitled Design 2026 10 19T125811.298

‘pach-footacha Bachchan’ crosses borders in America : आंदोलने आणि नवरात्रोत्सवाच्या धामधुमीमुळे सुरुवातीला संथ प्रतिसाद मिळालेल्या “पाच फुटाचा बच्चन” या मराठी चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात जोरदार उसळी घेतली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या चित्रपटाची चर्चा सुरू असून, चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळू लागले आहेत. आपल्या वेगळ्या नावामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेला हा चित्रपट नुकताच, म्हणजे नऊ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी रितेश देशमुख यांच्या हस्ते चित्रपटाचा ट्रेलर दिमाखात प्रदर्शित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचीही मनोरंजनविश्वात चर्चा झाली.

मात्र, सीजेपीचे आंदोलन, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि नवरात्रोत्सवाची धामधूम यांमुळे सुरुवातीला चित्रपटाकडे प्रेक्षकांचे फारसे लक्ष गेले नाही. आता मात्र चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात – पुणे, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नगर इथे बच्चनने जोर धरलाय. त्याच सोबत येत्या आठवड्यात ‘बच्चन’चे अमेरिकेत सीमोल्लंघन होणार आहे. त्यामुळे परदेशी प्रेक्षकांपर्यंत मराठी मातीचा सुगंध पोचणार आहे.

एका महिला कीर्तनकाराची व्यक्तिरेखा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. श्रुती मधुदीप या दमदार अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण चित्रपटाचा तोल सांभाळला आहे. तसेच कौस्तुभ रमेश देशपांडे याची खिळवून ठेवणारी कथा आणि खुसखुशीत संवाद यासाठी प्रेक्षक खास दाद देत आहेत. विठुरायाचा जयघोष करणारा आणि कीर्तनपरंपरेतील मूल्यांचा वेध घेणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागला आहे.

टायगर श्रॉफवर गोळ्या झाडणारे आणि त्यांचे ‘आका’ दोघेही पकडले जाणार! मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

एकीकडे भोंदू कीर्तनकारांची चर्चा सुरू असताना, खरा कीर्तनकार कोण आणि कीर्तनपरंपरेचा मूळ गाभा काय, याचा विचार करायला लावणारा हा चित्रपट लक्षवेधी ठरत आहे. समता, सामाजिक जाणीव आणि संतविचारांचा संदेश देणारा हा सिनेमा मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना अंतर्मुखही करतो. चित्रपटातील गाणी आणि संगीत हे त्याचे आणखी एक बलस्थान आहे. चित्रपटातील गाणी चित्रपटगृहांबाहेरही ऐकू येऊ लागली आहेत. अभिनेते किशोर कदम, चिन्मयी सुमीत, शशांक शेंडे, गौरी नलावडे, क्षितीश दाते असे अनेक परिचित चेहरे या चित्रपटात आहेत. त्यांच्यासोबत नवोदित कलाकारांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत.

समतेची वाट दाखवणारा, आयुष्यातील नकारात्मक गोष्टी वजा करण्याची प्रेरणा देणारा आणि प्रेम व सहजीवनाचा अर्थ उलगडून सांगणारा हा चित्रपट कुटुंबासह पाहण्यासाठी प्रेक्षक पसंती देत आहेत. विशेषतः नव्या पिढीला हा चित्रपट भावत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला संथ प्रतिसाद मिळालेल्या पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात वेग पकडला असून, वाढती चर्चा आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद यामुळे या मराठी चित्रपटाच्या वाटचालीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version