‘Pahla Pyaar Doosri Baar’ to be released on October 23! : ‘पहला प्यार दूसरी बार’च्या निर्मात्यांनी अखेर चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये उत्साहाने भरलेला नवा ग्रुप पाहायला मिळत असून, हा चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. फ्रेंडशिप-कॉमेडी या जॉनरमधील या चित्रपटाचे दिग्दर्शन पदार्पण करणारे दिग्दर्शक अनुज सैनी यांनी केले आहे, तर लव फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रिलेशनशिपवर आधारित मनोरंजक चित्रपट देणाऱ्या या बॅनरने हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता आपल्या या चित्रपटातून हा बॅनर अलीशा चोप्रा, स्पर्श वालिया, साक्षी वैद्य, कुणाल वैद्य, सरगुन कौर लूथरा आणि तुषार छिब्बर या सहा नव्या चेहऱ्यांना ऑन-स्क्रीन लॉन्च करत आहे. चित्रपटाच्या रिलीज झालेल्या जबरदस्त फर्स्ट लुक पोस्टरमध्ये हे सर्व युवा कलाकार एकत्र पाहायला मिळत आहेत.
‘पहला प्यार दूसरी बार’चे फर्स्ट लुक पोस्टर अतिशय मजेशीर, मॉडर्न आणि ग्लॅमरने भरलेले असल्याने रिलीज होताच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पोस्टरमध्ये सर्व कलाकार मस्तीभऱ्या पोझमध्ये आपल्या स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत. पोस्टरमधील रंगीत ट्रीटमेंट त्याला बोल्ड आणि डायनॅमिक अंदाज देते. निर्मात्यांनी या नव्या चेहऱ्यांची शानदार पद्धतीने ओळख करून दिली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे. चित्रपटाचे लक्षवेधी नाव आणि आकर्षक पोस्टर पाहून या नव्या कलाकारांना आणि त्यांच्या कथेला जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होत आहे.
SSC-HSC Exam 2027 दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जानेवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा
नव्या चेहऱ्यांना लॉन्च करणे हे लव रंजन यांच्यासाठी परिचित असले तरी तितकेच मजेदार काम आहे. याबद्दल लव रंजन म्हणतात, “न्यूकमर्सना लॉन्च करणे हे नेहमीच एक आव्हान राहिले आहे, पण हे असे आव्हान आहे ज्याची मला खरोखरच प्रतीक्षा असते. आजपासून पंधरा वर्षांपूर्वी ‘प्यार का पंचनामा’च्या माध्यमातून मला ही संधी मिळाली होती आणि ‘पहला प्यार दूसरी बार’च्या माध्यमातून पुन्हा एकदा अशीच संधी माझ्यासमोर आली, तेव्हा मला माहित होते की ही संधी मला सोडायची नाही. एक लेखक म्हणून सहा नव्या चेहऱ्यांसाठी एक जग निर्माण करणे आणि त्यांना त्या जगात स्वतःची रिदम शोधताना पाहणे, मला खूप आवडले. जेव्हा लोकांना चांगले वाटते, तेव्हा कथा स्वतःची एक वेगळी एनर्जी शोधून काढते आणि हे सहा कलाकार प्रेक्षकांना भेटणार आहेत, याबद्दल मी खूप उत्सुक आहे.”
‘पहला प्यार दूसरी बार’ हा चित्रपट ‘लव फिल्म्स’द्वारे प्रस्तुत करण्यात येत आहे, तर त्याचे दिग्दर्शन अनुज सैनी यांनी केले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
