Seema Haider: कपिल शर्माच्या शो ची ऑफर आल्यानंतर सीमा हैदरचे थेटच उत्तर; म्हणाली…

Seema Haider: कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) आणि बिग बॉस (Big Boss) हे टीव्ही विश्वातील लोकप्रिय शो आहेत. या शो मध्ये सहभागी होण्याच खूप जणाचं स्वप्न असतं. या दोन पैकी एका शो ची ऑफर मिळणं, ही कुठल्याही मोठ्या कलाकारासाठी महत्वाची गोष्ट असते. परंतु तुम्हाला ऑफर आली आणि तुम्ही नकार दिलात, तर तुम्ही याला […]

Seema Haider

Seema Haider

Seema Haider: कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) आणि बिग बॉस (Big Boss) हे टीव्ही विश्वातील लोकप्रिय शो आहेत. या शो मध्ये सहभागी होण्याच खूप जणाचं स्वप्न असतं. या दोन पैकी एका शो ची ऑफर मिळणं, ही कुठल्याही मोठ्या कलाकारासाठी महत्वाची गोष्ट असते. परंतु तुम्हाला ऑफर आली आणि तुम्ही नकार दिलात, तर तुम्ही याला काय म्हणाल? पाकिस्तानातून (Pakistan) भारत देशात आलेल्या सीमा हैदरबद्दल एक माहिती समोर आली आहे.


सीमा हैदरला या दोन्ही शो ची ऑफर मिळाली आहे. परंतु तिने सध्या या कार्यक्रमाला नकार दिला आहे. तिने या शो ची ऑफर थेट फेटाळून लावली नाही. सीमा हैदरने स्वत:च या गोष्टीविषयी माहिती दिली आहे की, कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी तिला आणि तिचा नवरा सचिन मीणाला ऑफर देण्यात आली होती. त्या दोघांना मुंबईला बोलवण्यात आलं होतं. अशाच प्रकारे त्यांना भाईजानचा बहुचर्चित शो बिग बॉसची ऑफर मिळाली होती.

तसेच सीमाने पुढे सांगितल आहे की, सध्या या कुठल्याही शो मध्ये सहभागी होण्याचा प्लान नाही. जेव्हा कधी असा प्लान होईल, तेव्हा आम्ही त्यावेळेस जरुर तुम्हाला कळवू, असं सीमाने यावेळी थेटच सांगितलं आहे. सीमा हैदरने हे वक्तव्य केल्यावर तिचे वकिल एपी सिंह यांनी सुद्धा व्हिडिओव्दारे वक्तव्य केल आहे. कायदेशीर दृष्ट्या कुठल्याही शो मध्ये सहभागी होणं सीमासाठी घातक ठरणार आहे. सीमाची सध्या जोरदार चौकशी सुरु आहे असं तिच्या वकीलाने यावेळी सांगितलं आहे. सरकारी यंत्रणांकडून सध्या तिचा जोरदार तपास सुरु आहे. तपास संपल्यानंतर अशा कोणत्याही शो किंवा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा विचार केला जाणार नाही.

Box Collection: आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ७ दिवसात कमावले इतके कोटी…

या संबंधात मी सचिन आणि सीमाशी बोललोय असं तिचे वकील एपी सिंह यांनी यावेळी सांगितले आहे. सीमा हैदरने व्हिडिओची सुरुवात जय श्रीरामच्या घोषणेने केली. तिने हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा देखील दिल्या आहेत. पाकिस्तानातून आलेल्या सीमाने इस्लाम सोडून मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आहे. सीमा हिंदू धर्माचे वेगवेगळे सण हिंदू परंपरेनुसार साजरे करत आहे. सध्या ती व्रत ठेवत आहे. देवांच्या फोटोंची पूजा करते. चांद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगसाठी तिने व्रत ठेवलं होतं. सीमा हैदर देशात आल्यानंतर कायम माध्यमांना मुलाखती देऊन जोरदार प्रसिद्धीच्या झोतात होती. आता या दोन मोठ्या शोच्या रुपाने तिला संधी मिळत असताना तिने दिलेल्या उत्तराने सर्वानाच चक्रावून सोडले आहे.

Exit mobile version