छायाचित्रणातील जादूगार रघु राय आणि मृदंगम सम्राट पालघाट रघु यांच्या कलाप्रवासाचा MIFF मध्ये गौरव

"रघु राय : हिअरिंग थ्रू द आयज" या माहितीपटाने ख्यातनाम छायाचित्रकार रघु राय यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या कलात्मक प्रवासाचा वेध घेतला.

Untitled Design (11)

Untitled Design (11)

Palghat Raghu’s artistic journey honored at MIFF : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात MIFF च्या १९व्या आवृत्तीत आज होमेज विभागात दोन महत्त्वपूर्ण माहितीपटांचे प्रदर्शन करण्यात आले. भारतीय छायाचित्रण, चित्रपटसृष्टी आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांना श्रद्धांजली वाहणारे हे माहितीपट प्रेक्षकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले.

दिग्दर्शक सुवेंदू चॅटर्जी यांच्या “रघु राय : हिअरिंग थ्रू द आयज” या माहितीपटाने भारतातील ख्यातनाम छायाचित्रकार रघु राय यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या कलात्मक प्रवासाचा वेध घेतला. 1977 साली जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार हेन्री कार्तिए-ब्रेसाँ यांनी रघु राय यांना प्रतिष्ठित मॅग्नम फोटोज संस्थेसाठी नामांकित केले होते. या माहितीपटातून त्यांच्या छायाचित्रांमागील विचार, अनुभव आणि संवेदनशील दृष्टीकोन उलगडण्यात आला आहे.

रघु राय यांची “दर्शन” ही संकल्पना या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या मते छायाचित्रण म्हणजे केवळ एखादा क्षण टिपणे नसून त्या व्यक्तीशी, त्या प्रसंगाशी भावनिक आणि आध्यात्मिक नाते निर्माण करणे होय. मदर तेरेसा यांची गाजलेली छायाचित्रे, गणेश विसर्जन, ताजमहाल, नागा साधू तसेच भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवणारे अनेक ऐतिहासिक क्षण या माहितीपटात पाहायला मिळतात.

या चित्रपटात रघु राय यांची कन्या आणि चित्रपट निर्माती अवनी राय हिचाही सहभाग आहे. तिच्या नजरेतून कॅमेऱ्यामागील रघु राय या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू समोर येतो. दोन पिढ्यांतील कलावंतांचा हा संवाद माहितीपटाला अधिक समृद्ध बनवतो. सर्जनशीलतेबाबत बोलताना रघु राय प्रेमाला कलात्मक अभिव्यक्तीचा मूलाधार मानतात. छायाचित्र स्वतः बोलले पाहिजे, असे त्यांचे मत असून तरुण छायाचित्रकारांनी स्वतःची स्वतंत्र शैली शोधण्याचा सल्लाही ते देतात.

स्वाक्षरीशिवाय जबाब, पत्राचा रेकॉर्ड गायब, कबुलीजबाबात तफावत, पवनराजे हत्या प्रकरणात सीबीआयवर कोर्टाचे ताशेरे

याचबरोबर आज प्रदर्शित करण्यात आलेला दुसरा माहितीपट होता “ताला अँड रिदम – मृदंगम प्लेड बाय पालघाट रघु”. फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडियाने निर्मित केलेला हा माहितीपट ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केला आहे. हा माहितीपट कर्नाटकी शास्त्रीय संगीतातील सर्वात महत्त्वाच्या आणि प्राचीन तालवाद्यांपैकी एक असलेल्या मृदंगमची ओळख करून देतो. प्रख्यात तालवादक पालघाट रघु यांच्या सादरीकरणातून ताल, लय, ठेका, आवर्तन आणि उत्स्फूर्त रचनांच्या संकल्पना अत्यंत सोप्या पद्धतीने उलगडल्या जातात.

मृदंगम वादनातील बोटांची हालचाल, विविध नादछटा, लयबद्ध रचना आणि त्यामागील कठोर साधना यांचेही या माहितीपटात प्रभावी दर्शन घडते. भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा जपणाऱ्या गुरु-शिष्य परंपरेलाही या माहितीपटात विशेष स्थान देण्यात आले आहे. पिढ्यान्पिढ्या मौखिक परंपरेतून हस्तांतरित होत आलेले संगीतज्ञान आणि त्यामागील नातेसंबंध यांचे संवेदनशील चित्रण यात करण्यात आले आहे.

होमेज विभागात सादर झालेल्या या दोन्ही माहितीपटांनी भारतीय कला, संस्कृती आणि परंपरेचा अमूल्य वारसा जपणाऱ्या दिग्गजांच्या कार्याला अभिवादन केले. त्याचबरोबर प्रेक्षकांना भारतीय छायाचित्रण आणि शास्त्रीय संगीताच्या समृद्ध परंपरेचा नव्याने परिचय करून दिला.

Exit mobile version