Download App

The Vaccine War: विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; अभिनेत्रीने पोस्ट करत लिहिलं…

The Vaccine War: ‘द काश्मीर फाइल्स’च्या (The Kashmir Files) घवघवीत यशानंतर गेल्या काही महिन्यापासून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी त्यांच्या आगामी सिनेमा ‘द व्हॅक्सिन वॉर’ची (The Vaccine War) घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासून देशात हा सिनेमा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. (First Look) गेल्या काही महिन्यापासून ते या सिनेमावर अहोरात्र काम करत आहेत. (Social media) मध्यंतरी या सिनेमाचा एक छोटासा टीझर देखील चाहत्यांच्या भेटीला आला होता. आणि यामुळे चाहत्यांची आणखीनच उत्सुकता वाढली होती.


देशात बनवलेली कोविडची लस आणि त्यामागचा संघर्ष या सिनेमातून बघायला मिळणार आहे. देशामध्ये कोविड काळात कशा प्रकारे वॅक्सिन तयार करण्यात आली आणि त्यामागे असलेली कितीतरी महिलांची मेहनतीची रंजक अशी कहाणी विवेक अग्निहोत्री या सिनेमाच्या माध्यमातून मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे.

आता या सिनेमाशी निगडीत एक नवी अपडेट समोर आली आहे. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. पल्लवी जोशीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सिनेमाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लूक दाखवण्यात आले आहे.

वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा; नाना पाटेकरांनी मुनगंटीवारांना फटकारलं

या पोस्टरमध्ये नाना पाटेकर आणि पल्लवी जोशी हे मुख्य भूमिकेत बघायला मिळणार असून त्यांचा फर्स्ट लूक या पोस्टरच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे. सोबतचच सप्तमी गौडा, गिरिजा ओक, रायमा सेन आणि अनुपम खेर यांच्या देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सगळ्या कलाकारांची ओळख या पोस्टरमधून करून दिल्याचे बघायला मिळत आहे. ‘देशातील पहिला बायो-सायन्स सिनेमा’ असं म्हणत पल्लवीने हे पोस्टर शेअर केल्याचे दिसत आहे. येत्या २८ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us