Download App

बॉलिवूडचा खिलाडी, सिंघम अन् किंग खान केंद्राच्या रडारवर; तंबाखूच्या जाहिरातीसाठी थेट धाडली नोटीस

Pan Masala Ad Case: गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar), किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सिंघम म्हणजेच चाहत्यांचा लाडका अजय देवगण (Ajay Devgan) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना, केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला कळवले की त्यांनी अखिलाडी, सिंघम अन् किंग यांच्यावर गुटखा कंपन्यांसाठी केलेल्या जाहिरातींबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाने यावर पुढील कारवाईचा तपशील मागवला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 मे 2024 रोजी होणार आहे.

केंद्र सरकारच्या वकिलांनी शुक्रवारी उच्च न्यायालयाला माहिती दिली आहे की, सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अशा स्थितीत याचिका तातडीने फेटाळण्यात यावी. युक्तिवादानंतर खंडपीठाने पुढील सुनावणीसाठी 9 मे 2024 ही तारीख देण्यात आली आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने आधी केंद्र सरकारने याचिकाकर्त्याच्या प्रतिनिधित्वावर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. मोठमोठे पुरस्कार मिळालेले पण गुटखा कंपन्यांच्या जाहिराती करणारे अभिनेत्यांवर कारवाई व्हायला हवी, असा युक्तिवाद त्यांनी केला होता.

किंग खानने दाखवली दुसऱ्या ‘ओ माही’ गाण्याची झलक; पुन्हा एकदा दिसणार रोमँटिक अंदाजात

अमिताभ बच्चन यांनी कायदेशीर नोटीसही बजावली होती

याचिकाकर्त्याने सुनावणीदरम्यान असेही सांगितले आहे की, 22 ऑक्टोबर रोजी या अभिनेत्यांच्या वतीने लोकांनी सरकारसमोर आपले म्हणणे मांडले होते. मात्र, असे असतानाही याप्रकरणी कोणतीही कार्यवाही झाली नाही. यानंतर अवमान याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांना नोटीस बजावली होती, त्यानंतर शुक्रवारी डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी न्यायालयाला सांगितले की, केंद्राने अक्षय कुमारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता शाहरुख खान आणि अजय देवगण या दोघांना नोटीस बजावली आहे.

अमिताभ बच्चन यांनी यापूर्वीच आपला करार रद्द केला असूनही त्याची जाहिरात दाखवणाऱ्या गुटखा कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले आहे.

Tags

follow us