Download App

अखेर प्रतीक्षा संपली! जबरदस्त डायलॉग अन् कॉमेडीचा तडका, ‘Aankh Micholi’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

  • Written By: Last Updated:

Aankh Michol Date Release: मृणाल ठाकूर आणि अभिमन्यू दासानी लवकरच ‘आंख मिचोली’ (Aankh Michol ) या कौटुंबिक मनोरंजनासाठी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. (Paresh Rawal) गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते, (Aankh Michol ) त्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली. आता निर्मात्यांनी ‘आंख मिचोली’चा ट्रेलर रिलीज करत सिनेमाची प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे, यामुळे चाहत्यांमध्ये आणखीच उत्सुकता वाढली.


उमेश शुक्ला हे ‘ओएमजी: ओह माय गॉड’ (OMG) मधील दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध आहेत. त्याने ‘आंख मिचोली’ हा सिनेमा देखील दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा हटके कलाकारांसह एक मनोरंजक प्रवास असणार आहे. हा सिनेमा ऐन दिवाळीत चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. एका भारतीय लग्नाभोवती फिरणारा, हा चित्रपट दोन न जुळलेल्या कुटुंबांचे वेडेपणा दाखवतो, जो प्रेक्षकांना हास्य, नाटक आणि भावनांच्या आनंददायी प्रवासात घेऊन जाणार आहे.

ट्रेलर शेअर करत असताना मृणाल ठाकूरने लिहिले, “तुमच्या डोळ्यांसाठी ही एक छोटीशी मेजवानी आहे. संपूर्ण कुटुंबासाठी हशा आणि आनंदाने भरलेल्या उत्कृष्ट मनोरंजनासाठी सज्ज व्हा. आता ‘आंख मिचोली’चा ट्रेलर रिलीज करत हा सिनेमा 3 नोव्हेंबर दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Singham Again: सिंघममध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री; स्पेशल टास्क फोर्स ऑफिसर एसीपी सत्याच्या भूमिकेत दिसणार

मृणाल ठाकूरशिवाय अभिमन्यू दासानी, परेश रावल, शर्मन जोशी, दिव्या दत्ता, अभिषेक बॅनर्जी, दर्शन जरीवाला, ग्रुषा कपूर आणि विजय राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे संगीत सचिन-जिगर यांनी दिले आहे. उमेश शुक्ला दिग्दर्शित, जितेंद्र परमार लिखित आणि सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन, उमेश शुक्ला आणि आशिष वाघ यांच्या मेरी गो राऊंड स्टुडिओ निर्मित, आंख मिचोली 3 नोव्हेंबर दिवशी संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us