Parineeti Chopra Raghav Chadha यांची लगीनघाई! विद्युत रोषणाईनं सजलं मुंबईतील घर

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (parineeti chopra a) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा (raghav chadha) यांच्या लग्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा रंगल्या होत्या. परिणीती आणि राघव चड्ढा यांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. लवकरच परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 12T100549.953

Parineeti Chopra Raghav Chadha

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (parineeti chopra a) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा (raghav chadha) यांच्या लग्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा रंगल्या होत्या. परिणीती आणि राघव चड्ढा यांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. लवकरच परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार येत्या 13 मे ला (उद्या) परिणीती आणि राघव यांचा दिल्लीत साखरपुडा होणार आहे. दरम्यान परिणीतीचे मुंबईमधील घरदेखील आकर्षक रोषणाईने सजले आहे. परिणीतीच्या आलिशान घराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत परिणीतीच्या घरी साखरपुड्याच्या तयारीला सुरुवात झाल्याची बघायला मिळत आहे.

आकर्षक रोषणाईने नवरीबाईंचे घर चांगलेच सजले आहे. परिणीतीचे हे घर मुंबईमधील वांद्रे येथील आहे. या घरच्या व्हिडीओवर चाहते जोरदार कमेंट्स करत परिणीतीला शुभेच्छा देत आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार परिणीती साखरपुड्यामध्ये मनीष मल्होत्राने (Manish Malhotra) डिझाइन केलेले आउटफिट परिधान करणार आहे. गेल्या काही दिवसाअगोदर परिणीती मनीष मल्होत्राच्या घराबाहेर स्पॉट झाली होती.

‘द केरळ स्टोरी’ची सहाव्या दिवशीही छप्पर फाड कमाई, कमावले ‘इतके’ कोटी

परिणीतीचा साखरपुड्यातील लूक आलिया-कतरिनापेक्षा हटके असणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. परिणीतीसाठी खास सुंदर नक्षीकाम केल्याचा लेहेंगा डिझाईन केल्याचे देखील सांगितले जात आहे. परिणीती आणि राघव रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसापासून जोरदार सुरु होत्या. दोघांनाही अनेकदा लंच आणि डिनर डेटला स्पॉट करण्यात आले आहे. अनेक मुंबई आणि दिल्ली विमानतळावर देखील दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत.

Nawazuddin Siddiqui: चित्रपटांतील भूमिकेवर नवाजुद्दीन सिद्दिकीने मौन सोडलं; म्हणाला, ‘आता फक्त…’

तसेच आयपीएल बघण्यासाठी देखील दोघेही स्टेडिअमध्ये गेले होते. आता परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी चाहते उत्सुक आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नसोहळ्यासाठी चाहते उत्सुक आहेत. साखरपुडा अवघ्या एक दिवसावर आला असला तरी दोघांनीही अद्याप त्यांच्या रिलेशनबद्दल काही देखील स्पष्टीकरण दिले नाही.

Exit mobile version