परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा यांची लगीनघाई, ‘अशी झाली तयारी’

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा (Raghava Chadha) काही दिवसांपासून चर्चेत आहेत. खरे तर दोघेही नुकतेच मुंबईत परत एकदा स्पॉट झाले होते. आधी ते डिनरसाठी एकत्र स्पॉट झाले आणि दुसऱ्या दिवशी हे जोडपे लंचसाठी एकत्र दिसले. यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. गायक-अभिनेता […]

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (19)

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (19)

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा (Raghava Chadha) काही दिवसांपासून चर्चेत आहेत. खरे तर दोघेही नुकतेच मुंबईत परत एकदा स्पॉट झाले होते. आधी ते डिनरसाठी एकत्र स्पॉट झाले आणि दुसऱ्या दिवशी हे जोडपे लंचसाठी एकत्र दिसले. यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. गायक-अभिनेता हार्डी संधूनेही परिणीती-राघव यांच्या नात्याला होकार दिला होता. आता हे जोडपे एंगेजमेंट (Parineeti-Raghava marriage) करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव लवकरच एंगेजमेंट करणार आहेत. परिणीती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एका इंटिमेट फंक्शनमध्ये राघव यांच्याशी एंगेजमेंट करणार आहे. दोघांपैकी कोणीही किंवा त्यांच्या कुटुंबाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, “परिणिती-राघव त्यांच्या एंगेजमेंटच्या तयारीत पूर्णपणे गुंतले आहेत. पुढच्या आठवड्यात त्यांची दिल्लीत एंगेजमेंट होणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, “परिणिती-राघव यांचा एंगेजमेंट सोहळा लवकरच होणार आहे. दोघांही स्पेशल डे च्या दिवशी नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या साक्षीने ते एंगेजमेंट करणार आहे. परिणीतीची चुलत बहीण प्रियांका चोप्रा देखील तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबत भारतात आहे, त्यामुळे ती परिणीती-राघव यांच्या एंगेजमेंटला उपस्थित राहू शकते. या सोहळ्यासाठी परिणीतीची चुलत बहीण मीरा कपूरही दिल्लीत पोहोचली आहे.

महावीर जयंती; जाणून घ्या, भगवान महावीरांची तत्त्वे आणि महत्व

परिणीती आणि राघव हे काही दिवसांपूर्वी विमानतळावर स्पॉट झाले होते. यादरम्यान परिणीती ऑल-ब्लॅक लूकमध्ये दिसली, तर राघवने बेज रंगाचा शर्ट घातला होता. या दरम्यान परिणीतीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता. फोटो कॅप्शनमध्ये परिणीतीने ‘चश्मीश’ असे लिहिले आहे. त्यानंतर अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करत राघवने हेच नाव ठेवलं आहे का, असा प्रश्न केला.

Exit mobile version