Download App

PATHAN : शाहरुखच्या पठाणची तब्बल 924 कोटींची कमाई

  • Written By: Last Updated:

शाहरुख खानचा ( Shahrukh Khan )  पठाण ( Pathan )  या सिनेमाने तिसरा आठवड्यात तब्बल 924 कोटींची कमाई केली आहे. यशराज फिल्म्सने हा सिनेमा निर्मित केलेला असून सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. शाहरुख खानच्या पठाण या सिनेमाने देशभरात काँट्रावरसी निर्माण झाली होती. तरीसुद्धा या सिनेमाने जोरदार कमाई केलेली आहे, आणि या आठवड्यात देखील हा सिनेमा अशीच कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

पठाण सिनेमाने तिसऱ्या शनिवारी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. पठाणणे भारतात 11.25 कोटी नेट जमा केले आहेत. पठाणने आता एकट्या परदेशात $42.85 दशलक्ष कमावले आहेत, तर भारतात नेट कलेक्शन 476.05 कोटी आहे.  या सिनेमाने जगभरात  924 कोटी कमावले आहेत.

पठाण हा आता हिंदी चित्रपटांच्या इतिहासात जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे आणि YRF च्या स्पाय युनिव्हर्सचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. पठाण, आदित्य चोप्राच्या महत्त्वाकांक्षी गुप्तचर विश्वाचा एक भाग आहे आणि त्यात देशातील सर्वात मोठे सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम आहेत.

Tags

follow us