मुंबई : बॉलिवूड किंग शाहरुख (Shah Rukh Khan) खानच्या पठाणने (Pathan) देशांतर्गत आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केलीय. त्याने अवघ्या 5 दिवसांत जगभरात 542 कोटींची कमाई केली आहे.
सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) पठाणने 5 दिवसांत 542 कोटी कमाई केली. रीलीजच्या 5 व्या दिवशी त्याची भारतातील एकूण कमाई 60.75 कोटींवर आहे. तर परदेशातील कमाई 42 कोटी आहे, तर एकूण कमाई 100 कोटींपेक्षा जास्त आहे.
या अगोदर पठाणने चार दिवसांत भारतात 200 कोटींचा टप्पा ओलांडला होता. अवघ्या 4 दिवसांत 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा पठाण पहिला हिंदी चित्रपट आहे. ‘पठाण’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ओपनिंग डेला 55 कोटींची कमाई केली होती.
तर दुसऱ्या दिवशी 68 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी आणि चौथ्या दिवशी 50 कोटींची कमाई केली आहे. भारतात या सिनेमाने रिलीजच्या चौथ्या दिवसापर्यंत 211 कोटींची कमाई केली आहे.
शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा जगभरात 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात शाहरुखसह दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) देखील मुख्य भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे.