Shahrukh Khan : ‘द अलकेमिस्ट’ चे लेखक पाउलो कोएल्होंनी केलं शाहरूखचं कौतुक

मुंबई : शाहरुख खानने चार वर्षांनंतर ‘पठान’ या चित्रपटामधून पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर पुरनागमन केलं आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपट फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये प्रदर्शित करण्यात आला. जगभरातील प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. चित्रपटाची क्रेज रिलीजच्या 10 व्या दिवशीही कायम आहे. तर कमाई देखील रेकॉर्डतोड सुरू आहे. शुक्रवारी […]

Shahrukh Pavlo

Shahrukh Pavlo

मुंबई : शाहरुख खानने चार वर्षांनंतर ‘पठान’ या चित्रपटामधून पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर पुरनागमन केलं आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपट फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये प्रदर्शित करण्यात आला. जगभरातील प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. चित्रपटाची क्रेज रिलीजच्या 10 व्या दिवशीही कायम आहे. तर कमाई देखील रेकॉर्डतोड सुरू आहे. शुक्रवारी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

त्यातच आता ‘द अलकेमिस्ट’ या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक पाउलो कोएल्हो यांनी किंग खान शाहरूख खानचं कौतुक केलं आहे. पाउलो कोएल्हो यांनी ट्विट केलं आहे की, ‘किंग, लिजेंड, मित्र मात्र यापेक्षाही एक महान अभिनेता (पश्चिमेत ज्यांना शाहरूख माहिती नाही त्यांनी ‘माय नेम इज खान’ नक्की बघावा.) असा सल्ला त्यांनी दिला आहे.

त्यानंतर लेखक पाउलो कोएल्हो यांच्या ट्विटला अभिनेता शाहरूख खाननेही रिप्लाय दिला आहे. आपल्या या ट्विटमध्ये शाहरूखने कोएल्हो यांचं ट्विट कोट केलं. तो म्हणाला की, ‘तुम्ही खूप प्रेमळ आहात, माझ्या मित्रा. आपण लवकरच भेटू’. असा रिप्लाय शाहरूख खानने दिला आहे. तर या अगोदर देखील लेखक पाउलो कोएल्हो यांनी शाहरूखचं कौतुक केलं आहे.

Exit mobile version