Download App

राहा तयार! पवन कल्याण स्टारर ‘OG’ चित्रपटाचे शुटिंग पूर्ण; ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

साऊथ सिनेमातील पावर स्टार पवन कल्याणने (Pawan Kalyan) नुकतीच त्याच्या OG या चित्रपटाची शुटींग पूर्ण केली आहे.

Pawan Kalyan : साऊथ सिनेमातील पावर स्टार पवन कल्याणने (Pawan Kalyan) नुकतीच त्याच्या OG या चित्रपटाची शुटींग पूर्ण केली आहे. प्रोडक्शन हाउस DVV एंटरटेनमेंटने सोशल मीडियावर एक जबरदस्त अपडेट शेअर केली आहे. जी वाचून सिनेरसिकांना नक्कीच आनंद होईल. गंभीरासाठी पॅकअप.. रिलीजसाठी तयार राहा.. 25 सप्टेंबर 2025 ला सिनेमागृहातच भेटू.. अशा कॅप्शनसह एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. #OGonSept2025 #TheyCallHimOG #OG” सुजितच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटात पवन कल्याण एका गंभीर भूमिकेत आहे. त्यामुळे त्याचे फॅन्स भरपूर एक्सायटेड दिसत आहेत.

या चित्रपटात अभिनेता इमरान हाशमी, प्रियंका अरुल मोहन, प्रकाश राज आणि श्रिया रेड्डी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर एस. थमन यांचे जादूई संगीत या चित्रपटाला लाभले आहे. ‘RRR’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या DVV एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली दानय्या गुरू आणि कल्याण दासरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या वर्षातील OG हा सर्वात मोठा चित्रपट असे सांगण्यात येत आहे.

करण जोहरने शरीराच्या ‘या’ भागाचा काढला विमा; दक्षिण कोरियात जाण्याचं कारण काय..

सुजित यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात हाय ऑक्टेन अॅक्शन, दमदार अभिनय आणि एक मनोरंजक कथा यांचं मिश्रण आहे. या चित्रपटात पवन कल्याण जबरदस्त अवतारात आहेत. ओजी चित्रपट हा बॉलीवूड अभिनेता इमरान हाशमी याचा पहिलाच तेलुगू चित्रपट आहे. पडद्यावर त्याची आणि पवन कल्याणची जबरदस्त टक्कर चित्रपटाचे खास आकर्षण आहे. प्रियंका अरुल मोहनने पवन कल्याणसोबत अभिनय केला आहे.

फॅन्स आणि ट्रेडवाल्यांकडून चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान कलेक्शन करील अशी भविष्यवाणी आतापासूनच केली जात आहे. या चित्रपटात पवन कल्याण गंभीर भूमिकेत दिसणार आहे. पवन कल्याण यांनी त्यांचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. आता चित्रपट पोस्ट प्रोडक्शनच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा तुम्हीही तयार राहा आणि  25 सप्टेंबरला थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्या.

दरम्यान, रिलीज होण्याआधीच ओजीचे ओटीटी राइट्स विक्री झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर याबाबत नेटफ्लिक्सने एक्सवर माहिती दिली. ओजी चित्रपट हिंदी बरोबरच तेलुगू, तामिळ, मलयालम आणि कन्नड भाषेत पाहता येईल. नेटफ्लिक्सने ओजीच्या पोस्ट थिएटर राइट्ससाठी 90 ते 100 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येत आहे.

follow us