भोपालमध्ये होणार राम चरण अभिनित पेड्डीचा ट्रेलर लॉंच सोहळा, भव्य नियोजन

Peddi-'पेड्डी' ट्रेलर लाँच सोहळा पुढील आठवड्यात शनिवारी भोपालमध्ये होणार आहे. या विशेष कार्यक्रमात चित्रपटाचे कलाकार, निर्माते हजेरी लावण्याची शक्यता.

Peddi 1

Peddi

Peddi Trailer Launch : ‘पेड्डी’ने (Peddi) आधीच 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटात जागतिक लोकप्रियता मिळवलेले राम चरण (Ram Charan) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि जगपती बाबू (Jagapati Babu) यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत याबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता या वाढत्या चर्चेदरम्यान चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेला नवी गती देत संपूर्ण चमू 16 मे रोजी भोपालमध्ये दाखल होणार असून, त्यामुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढणार आहे.

‘पेड्डी’ ट्रेलर लाँच सोहळा पुढील आठवड्यात शनिवारी भोपालमध्ये होणार आहे. या विशेष कार्यक्रमात राम चरण, दिग्दर्शक बुची बाबू सना, निर्माते वेंकट सतीश किलारू, सुकुमार आणि जान्हवी कपूर सहभागी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाची भव्यता अधिक खास करण्यासाठी ए. आर. रहमान यांच्या उपस्थिती बरोबरच त्यांच्या थेट संगीत सादरीकरणाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आलेला हा सोहळा यंदाच्या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपट कार्यक्रमांपैकी एक ठरू शकतो.

चित्रपटाच्या आगाऊ तिकीट नोंदणीला अमेरिकेत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय नुकतेच सुकुमार यांनी ‘पेड्डी’(Peddi) च्या चित्रीकरण स्थळाला भेट देत चित्रपटातील एकूण आशयाचे भरभरून कौतुक केले. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या प्रत्येक गोष्टीला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लोकांमध्ये या चित्रपटाबद्दल मजबूत भावनिक नाते निर्माण होताना दिसत आहे.

प्रत्येक नव्या सादरीकरणासह ‘पेड्डी’ हा सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत चालला आहे. चित्रपटातील प्रत्येक सादरीकरण मग ते ट्रेलर लाँच सोहळा असो, “चिकिरी चिकिरी” हे गाणे असो, “रई रई रा रा” हे गाणे असो किंवा पोस्टर हे प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव टाकण्यात यशस्वी ठरले आहे. प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना ‘पेड्डी’च्या अनोख्या विश्वात घेऊन जाते. हा पूर्णपणे आशयाचा विजय असून, त्यामध्ये कोणताही दिखावा नाही.

बुची बाबू सना लिखित आणि दिग्दर्शित ‘पेड्डी’मध्ये राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत शिव राजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदू शर्मा आणि जगपती बाबू हे कलाकार दिसणार आहेत. वेंकट सतीश किलारू यांच्या ‘वृद्धी सिनेमाज’ या संस्थेखाली, प्रमुख निर्मिती संस्था ‘मैत्री मूव्ही मेकर्स’च्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. उत्तर भारतात ‘जिओ स्टुडिओज’तर्फे हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. ‘पेड्डी’ ४ जून २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version