Download App

Urfi Javed Arrest: शॉर्ट ड्रेस परिधान करणे पडले महागात! उर्फी जावेदला अटक?

Police Arrest Urfi Javed: आपल्या ड्रेसिंग स्टाईलसाठी तसेच हटके लूकसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत राहते. तिचे कपडे तिची वेगळी ओळख करून देतात. तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ती ट्रोल देखील होते. दरम्यान आता उर्फी बाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. उर्फी जावेदचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मुंबई पोलीस (Mumbai Police) उर्फी जावेदला अटक करून पोलीस ठाण्यात नेताना दिसत आहेत. हे पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे, हे नेमकं काय प्रकरण आहे? मात्र, हा व्हिडीओ खरा आहे की, प्रँक आहे अशी अद्याप समोर आली नाही.


पापाराझींनी उर्फीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पोलीस रेस्टॉरंटमध्ये आलेल्या उर्फी जावेदला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना बघायला मिळत आहेत. यावेळी उर्फी काहीशी वैतागलेली दिसते. तिची पोलिसांशी चांगलीच बाचाबाची देखील झाल्याचे दिसत आहे. उर्फीने प्रश्न विचारताच, तेव्हा दोन महिला अधिकारी तिला सांगतात की, तिने लहान कपडे घातले आहेत आणि आता त्यासाठी तिला पोलिस स्टेशनला यावं लागेल.

यानंतर उर्फी जावेद सतत पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास नकार देत असताना दिसत आहे. परंतु, दोन्ही महिला अधिकारी तिची विनंती मान्य करत नाहीत आणि अभिनेत्रीला गाडीत बसवून घेऊन जात आहेत. मग, उर्फी म्हणते ही कशी वागणूक देताय मला? हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तिचे चाहते देखील चिंतेत पडले आहेत.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’सुरू होणार नवे पर्व; समृद्धी अन् शहजादा दिसणार मुख्य भूमिकेत

या व्हिडीओमध्ये नेमकं काय सत्य आहे, हे अद्याप समोर आलं नाही. परंतु, अचानक हे काय घडले याबद्दल तिच्या चाहत्यांना प्रश्न पडले आहेत. हा व्हिडीओ खरा आहे की, प्रँक असा सवाल देखील सध्या चाहते करत आहेत. बहुतेक लोकांनी याला प्रँक म्हटले आहे. तर काही लोकांनी कमेंट करत लिहिले आहे की, ‘ओव्हरअॅक्टिंगसाठी 50 रुपये काप यांचे..’. परंतु उर्फी जावेदने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

Tags

follow us