(Popular actor Atul Parchuren’s battle with cancer : जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाच्या बातमीनंतर आता पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी अभिनेता अतुल परचुरे यांना कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. स्वतः अतुल परचुरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी हि माहिती एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. (Popular actor Atul Parchuren’s battle with cancer; The news came on the 25th wedding anniversary)
लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी कॅन्सर झाल्याचे कळाले
अभिनेते अतुल परचुरे हे आपल्या लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी विदेशात गेले होते. त्यावेळी त्याना हळूहळू याचे लक्षणे दिसू लागले. त्यांना तेथे कावीळ झाली. त्यानंतर त्यांनी सोनोग्राफी केली. त्यावेळी त्यांना कळाले की त्यांना कावीळपेक्षा भयानक कॅन्सर हा आजार झाला आहे. असे त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. युट्यूबवरच्या ‘मित्र म्हणे’ पॉडकास्ट या कार्यक्रमात सौमित्र पोटेंनी घेतलेल्या मुलाखतीत अतुल परचुरे यांनी या गोष्टीचा खुलासा केला.
प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, घरातच आढळला मृतदेह
कॅन्सर झाल्याचे आईला कळल्यानंतर तिने मला काळजी करु नकोस असं सांगीतलं. पुढे बायचको सोनियाला कॅन्सर झाल्याचं सांगितलं तेव्हाही बायकोने अतुलला धीर दिला.
या मुलाखतीत अतुल म्हणाले.. त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली की तुमची कशावर तरी श्रद्धा हवी. मग ती पुस्तकावर असो, देवावर असो, स्वामी समर्थांवर असो, येशूवर, अल्लावर कुणावरही असो पण ती हवी आणि १०० टक्के हवी. माझी आई, बायको आणि माझी मुलगी या माझ्या तीन सपोर्ट सिस्टिम आहेत. माझी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. या संपुर्ण काळात अतुल यांना कुटूंबाने सपोर्ट केला. अतुल यांनी कॅन्सरशी यशस्वी लढा दिलाय.