Power Couple of Bollywood Jaya and Amitabh Bachchan Special journey : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडचं आदरणीय आणि प्रभावशाली जोडपं आहे. त्यांनी त्यांचं करिअर उल्लेखनिय बनवलं. ज्यामध्ये अमिताभ हे भारतीय चित्रपटांचे शहंशाह म्हणून ओळखले जातात. तर जया या अभिनेत्री आणि राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी चित्रपटांमध्ये देखील आपली ही जोडी हिट करून दाखवली. त्यामुळे त्यांची गोष्ट ही त्यांच्यातील एकोपा, आदर हे शिकवतो. त्यांनी त्यांच्या आयुष्यात समस्यांचा देखील सामना केला आहे. ज्यातून त्यांनी चाहत्यां समोर एक आदर्श ठेवला. त्यांच्या या खास प्रवासाचा आढावा टाईम्स एन्टरटेन्मेंटने घेतला आहे.
एक कालातीत प्रेमकथा आणि सहजीवन :
गुड्डी या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची प्रेमकथा सुरू झाली. तर जंजीर या चित्रपटादरम्यान त्यांचं प्रेम आणखी फुललं. त्यानंतर 1973 ला त्यांनी लग्न केलं. पाच दशकांहून अधिक ते सुख-दु:खामध्ये एकमेकांची साथ देत आहेत. त्यामुळे त्यांचं नात हे भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रेम आणि यशस्वी सहजीवनाचं एक उदाहरण ठरतं.
उत्पन्न आणि एकुण संपत्ती :
2024 च्या बिझीनेस टुडेच्या अहवालानुसार 2022-23 या अर्थिक वर्षामध्ये अमिताभ बच्चन यांची वैयक्तिक संपत्ती ही जवळपास 273.74 कोटी होती. तर जया यांची 1.63 कोटी . तर त्यांची दोघांची मिळून 1,578 कोटी एवढी संपत्ती आहे. जया यांचं उत्पन्न हे चित्रपटांतील भुमिका, जाहिराती आणि खासदार म्हणून मिळत असलेला पगार या ठिकाणहून येतं. अमिताभ यांचं उत्पन्न हे अभिनय, जाहिराती, व्याज, भाडे, सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणारा लाभांश, भांडवली नफा आणि शएअर बाजारातून मिळणारा नफा यातून येतं. 2024-25 या अर्थिक वर्षामध्ये अमिताभ बच्चन यांचं उत्पन्न हे 350 कोटी होतं. त्यामुळे ते भारतातील सर्वात जास्त करदात्यांपैकी एक आहेत.
अलिशान गाड्यांचं कलेक्शन :
अमिताभ बच्चन यांचं गाड्यांचं कलेक्शन उल्लेखनिय आहे. 2024 च्या सियासतच्या माहितीनुसार त्यांच्याकडे 16 गाड्या आहेत. त्यातून त्यांची आलिशान आणि स्टायलिस्ट जगण्याची आवड दिसून येते. त्यांच्या या अलिशान गाड्यांमध्ये बेंटली कॉन्टीनेंटल, रेन्ज रोव्हर ऑटोबायोग्राफी एलडब्लूबी, लेक्सस एलएक्स 570, टोयोटा लॅन्ड क्रुझर, मर्सिडिज जीएल 63 एएमजी, मर्सिडिज बेन्ज एस 350, पोर्शे केमन एस, मर्सिडिज बेन्ज – व्ही क्लास, मिनी कुपर एस, विन्टेज फोर्ड. या प्रेत्येक गाडीबद्दल त्यांची आवड दिसून येते. जया बच्चन यांच्याकडे देखील खास गाड्या आहेत. त्यामुळे त्यांचे गॅरेज हे त्यांच्या अलिशान जगण्याची साक्ष देतं.
अमिताभ अन् जया याचं करिअर :
जया बच्चन या शेवटी 2023 ला प्रसिद्ध चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये दिसल्या होत्या. सध्या त्या त्याच्या राजकीय जीवनात व्यस्त आहेत. तर अमिताब बच्चन हे शेवटी वेट्टीयां चित्रपटामध्ये दिसले होते. सध्या त्यांच्या सेक्शन 84 चित्रपटाचं शूटींग सुरू आहे. त्यांनंतर ते नाग अश्विनी यांच्या कल्की 2 मध्ये दिसणार आहेत. तसेच ते नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण: भाग 1’ मध्ये तो जटायूला आवाज देणार आहेत.