Adipurush Controversy: प्रभासचा ‘आदिपुरुष’ पुन्हा अडचणीत; सेन्सॉर बोर्डाकडे केली ही मागणी

Adipurush Controversy: अभिनेता प्रभासच्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या सिनेमाचा टीझर समोर आला, तेव्हा रावणासह इतर पात्रांच्या लूकवर जोरदार गोंधळ झाला होता. या सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. (Censor Board) आता हा सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर (Trailer) गेल्या काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी रिलीज […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 09T122951.693

Adipurush

Adipurush Controversy: अभिनेता प्रभासच्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या सिनेमाचा टीझर समोर आला, तेव्हा रावणासह इतर पात्रांच्या लूकवर जोरदार गोंधळ झाला होता. या सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. (Censor Board) आता हा सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

त्याचा ट्रेलर (Trailer) गेल्या काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी रिलीज केला आहे. समोर आलेला आदिपुरुषचा ट्रेलर चाहत्यांना आवडला आहे. याला लोकांचा मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे आणि आता चाहते हा सिनेमा बघण्यासाठी मोठे उत्सुक असल्याचे देखील दिसत आहेत. मात्र, या सिनेमाचे वादाशी नाते काही कमी होत नाही. आता या सिनेमाबाबत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय म्हटले आहे तक्रारीत?

सनातन धर्माचे प्रचारक संजय दीनानाथ तिवारी नावाच्या या व्यक्तीने ही तक्रार केली आहे, जेणेकरून पुढील धार्मिक भावना दुखावल्या जाण्यापासून वाचता येणार आहे. याअगोदर या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी मोठ्या चुका केल्या होत्या. ज्या सिनेमात पुन्हा घडू शकतात, असे तक्रारीमध्ये सांगण्यात आले आहे. आणि असे झाल्यास भविष्यामध्ये पुन्हा सनातन धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. त्यामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सेन्सॉर बोर्डाकडून ‘ही’ मागणी

सेन्सॉर बोर्डामार्फत सिनेमाची विशेष स्क्रीन टेस्ट व्हावी आणि सिनेमातील काही वादग्रस्त दिसल्यास ते काढून टाकावे, अशी विशेष मागणी या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदिपुरुष हा बिग बजेट सिनेमा आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याचे बजेट ५०० कोटीपेक्षा जास्त आहे. रामायणावर आधारित हा सिनेमा ओम राऊत दिग्दर्शित करत आहेत.

Nawazuddin Siddiqui: चित्रपटांतील भूमिकेवर नवाजुद्दीन सिद्दिकीने मौन सोडलं; म्हणाला, ‘आता फक्त…’

सिनेमा 16 जून रोजी होणार प्रदर्शित

या सिनेमात प्रभास मुख्य भूमिकेत आहे, जो श्रीरामची भूमिका साकारत आहे. क्रिती सेनॉन जानकीच्या भूमिकेत दिसणार आहे आणि सैफ अली खान लंकेश रावणाच्या भूमिकेत चाहत्यांना दिसून येणार आहेत. शिवाय सिनेमात देवदत्त नागे, सनी सिंग असे अनेक स्टार्स आहेत. हा सिनेमा 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version