Download App

‘Adipurush’ मधील रावणाच्या लूकमध्ये बदल, ट्रेलरचा व्हिडीओ व्हायरल…

Adipurush Trailer: मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत (Director Om Raut) याचा ‘तान्हाजी’ हा सिनेमा प्रचंड गाजला आणि चाहत्यांनी देखील त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. यानंतर आता त्याच्या ‘आदिपुरुष’ (Adipurush Trailer) सिनेमाकडे सर्व चाहत्यांचे मोठे लक्ष लागले आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट बघत होते.

अखेर या सिनेमाचा ट्रेलर (Movie Trailer) आज दुपारी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या काही तास अगोदरच या सिनेमाचा ट्रेलर लीक झाला आहे, त्याचाचं एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहे. हा सिनेमा रामायणावर आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवस या सिनेमाच्या ट्रेलरकडे अरविंद चाहत्यांचे मोठे लक्ष लागले होते.


गेल्या दोन-तीन दिवसाअगोदरच या सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आली होती. काल म्हणजेच ट्रेलर प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी हैदराबादमध्ये या सिनेमाच्या काही खास चाहत्यांसाठी या सिनेमाच्या ट्रेलरचे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यादरम्यान काहींनी हा ट्रेलर त्यांच्या मोबाइलवर देखील शूट केला आहे.

या व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये श्रीराम, लक्ष्मण हे सीता हे वनवासात जात असल्याचे दिसून येत आहे. राम आणि लक्ष्मण शबरीने दिलेली उष्टी बोरे खात असल्याचे देखील दिसून येतो आहे. आणि मग काही वेळानंतर हनुमानाची भूमिका साकारत असलेल्या अभिनेता देवदत्त नागेची या ट्रेलरमध्ये जोरदार एन्ट्री होते आणि तो लक्ष्मणाला बरे करण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणत असल्याचे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

यानंतर राम- लक्ष्मण वानरसेना आणि रामसेतूवरून श्रीलंकेला जात असल्याचे दिसून आले आहे. यानंतर या ट्रेलरमध्ये वानरसेना आणि लक्ष्मणाच्या सैन्यांमधील जोरदार युद्ध देखील दाखवण्यात आले आहे. तरी या ट्रेलरच्या शेवटी रावणाची एन्ट्री दाखवण्यात आले आहे. गेल्या वर्षी या सिनेमावर झालेल्या टीकेवर या सिनेमाच्या व्हीएफएक्समध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहे.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

या सिनेमातील रावणाचा लुक देखील बदलण्यात आला असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून आले आहे. या सिनेमात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना दिसून येणार आहे. तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या सिनेमामध्ये हनुमानाची भूमिका साकारत असल्याचे दिसून येतो आहे.

गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. पण या सिनेमाचा टीझर बघून यामध्ये दाखवल्या गेलेल्या दृश्यांमुळे या सिनेमावर टीका करण्यात आली होती. या केल्या गेलेल्या टीकेनंतर या सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. आता हा सिनेमा १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us