Download App

प्रभासच्या ‘सालार’ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; 12 दिवसांत केली 500 कोटींपेक्षा अधिक कमाई

Salaar Box Office Day 12: प्रभास (Prabhas) स्टारर ‘सालार’ पहिल्या (Salaar Movie) दिवसापासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. या चित्रपटाने 12 दिवसांत जगभरात 427 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 396 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याची स्पर्धा शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’शी होती. या चित्रपटाने डंकीला खूप मागे टाकले आहे.


‘सालार’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. पहिल्या दिवसाचे कलेक्शन 100 कोटी रुपये होते. अवघ्या काही काळात चित्रपटाने चार दिवसांत भारतात 255.54 कोटी रुपयांची कमाई केली आणि जगभरातील त्याचे कलेक्शन 600 कोटी रुपयांच्या पुढे गेले.

Sacknilk च्या अहवालानुसार, Salar ने पहिल्या दिवशी 90.7 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 56.35 कोटींचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाचे कलेक्शन 62.05 कोटी होते, चौथ्या दिवशी 46.3 कोटी, पाचव्या दिवशी 24.9 कोटी, सहाव्या दिवशी 15.6 कोटी, सातव्या दिवशी 12.1 कोटी कमावले होते. . या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकूण 308 कोटींचा व्यवसाय केला.

‘सालार’ने 8व्या दिवशी 9.62 कोटी, 9व्या दिवशी 12.55 कोटी, 10व्या दिवशी 15.1 कोटी, 11व्या दिवशी 16.6 कोटी आणि 12व्या दिवशी 7.50 कोटींचा व्यवसाय केला. कोटी त्यानंतर भारतात ‘सालार’चे एकूण कलेक्शन 369.37 कोटी झाले आहे.

सई-सिद्धार्थच्या लव्हस्टोरीची जुगलबंदी; ‘श्रीदेवी प्रसन्न’चा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित

प्रभासचा हा तिसरा चित्रपट आहे, या सिनेमाने जगभरात 600 कोटींचा आकडा पार केला आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘बाहुबली’ होता, ज्याने जगभरात 650 कोटींचा व्यवसाय केला होता. यानंतर याच चित्रपटाच्या ‘बाहुबली 2’ च्या सिक्वेलने जगभरात खळबळ उडवून दिली. चित्रपटाने एकूण 1,788 कोटींचा व्यवसाय केला. आता सालार हा त्याचा तिसरा चित्रपट असून त्याने हा आकडा पार केला आहे.

follow us