Download App

Prajakta Mali Movie: प्राजक्ता माळी झळकणार नव्या सिनेमात; ‘तीन अडकून सीताराम’ची घोषणा

Prajakta Mali: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. (New Marathi Movie) प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक अनोखे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध सिरियलमधून प्राजक्ता घराघरात पोहोचली. आता लवकरच प्राजक्ताचा नवा धमाकेदार सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.


‘तीन अडकून सीताराम’ असं प्राजक्ताच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात प्राजक्तासोबत वैभव तत्तवादी हा मुख्य भूमिका साकारत आहे. या सिनेमातील दोघांचे लूक समोर आले आहेत. २९ सप्टेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर सिनेमाचे पोस्टर शेअर करत सांगितले आहे की, “कोणाला नाही ऐकत, कोणाला नाही जुमानत.. दुनिया गेली तेल लावत ….असं म्हणत २९ सप्टेंबरपासून धुमाकूळ घालायला येत आहेत, ‘तीन अडकून सीताराम’ !”

नुकत्याच झळकलेल्या ‘तीन अडकून सीताराम’ मराठी सिनेमाच्या पोस्टरमध्ये तीन अंक दर्शवणारा एक हात बघायला मिळत आहे. त्या हातात बेडी दिसत आहे. तर बेडीच्या दुसऱ्या बाजुला स्माईली दिसत आहे. याचा नेमका काय संबंध? याचे उत्तर सिनेमा बघितल्यावरच मिळणार आहे. हृषिकेश जोशी हे नेहमीच हटके विषय हाताळत असतात, यामुळे या सिनेमातही काहीतरी भन्नाट घडणार असल्याचे पाहायला मिळणार हे नक्की!

Sonu Sood: सोनू ठरला मसीहा! अभिनेत्याने घडवला एक तरुण पायलट

प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सागायचं झालं तर, सिनेमा, नाटक, वेबसिरीजच्या माध्यमातून प्राजक्ता मुलीने आपल्या अभिनयाची छाप पडली आहे. जुळून येती रेशीमगाठी सिरियलमधून प्राजक्ताला खरी ओळख मिळाली होती. अभिनयासोबत प्राजक्ताने सुत्रसंचालन देखील केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मराठी विनोदी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राजक्ता माली करत आहे.

Tags

follow us