Download App

‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Ekda Yeun Tar Bagha Release Date : प्रसाद खांडेकर दिग्दर्शित (Prasad Khandekar) ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) हा मराठी सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत होत आहे. या सिनेमाचा टीझर, गाणी या सर्वांनीच लक्ष वेधून घेतले आहे. (Marathi Movie) या सिनेमात विशाखा सुभेदारसोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम यांसारखी दिग्गज स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. (Social media) मात्र आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारखेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.


‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) हा मराठी सिनेमा कौटुंबिक सिनेमा आहे. यामध्ये गिरीश कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय एका नव्याकोऱ्या हॉटेलची सुरूवात करत असल्याचे बघायला मिळणार आहे. या नव्या हॉटेलमध्ये अनेक अतरंगी पाहुण्याची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर मग गोष्टी कशा बदलत असतात याचा आनंद चाहत्यांना घेता येणार आहे.

‘एकदा येऊन तर बघा’ हा सिनेमा शुक्रवारी 24 नोव्हेंबर दिवशी प्रदर्शित होणार होता. परंतु आता काही कारणात्सव या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता येत्या 8 डिसेंबर दिवशी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Box Office : पहिल्याच दिवशी भाईजानच्या ‘टायगर-3’ चा छप्परफाड कमाई; ‘इतके’ कोटी कमवत कमबॅक

दरम्यान, या सिनेमात तब्बल 16 विनोदवीर भूमिका साकारणार आहेत. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. विशाखा सोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार, आदि चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करत आहे.

Tags

follow us