The Goat Life Box Office day 6: पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) स्टारर मल्याळम चित्रपट ‘आडू जीवितम: द गोट लाइफ’ (The Goat Life Movie) रिलीज झाल्यापासून थिएटरवर वर्चस्व गाजवत आहे. हा चित्रपट 28 मार्च 2024 रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि सुरुवातीपासूनच तो जोरदार कमाई करत आहे. ‘आडू जीवनम: द गोट लाइफ’चा भारतासह जगभरात दबदबा आहे. मात्र आता हळूहळू या चित्रपटाचे कलेक्शन कमी होताना दिसत आहे.
सकनिल्कच्या मते, ‘आडू जीवनम: द गोट लाइफ’ या चित्रपटाने 7.6 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर (Box Office) ओपनिंग करून दुसऱ्या दिवशी 6.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 7.75 कोटी आणि चौथ्या दिवशी 9.7 कोटींचा व्यवसाय केला. ‘आडू जीवनम: द गोट लाइफ’च्या कलेक्शनमध्ये पाचव्या दिवशी घट झाली आणि त्याने 5.4 कोटी रुपयांची कमाई केली. आता सहाव्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 4.50 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित राहिला.
मल्याळम चित्रपट हिंदी चित्रपटाला मागे टाकत आहे
‘आडू जीवनम: द गोट लाइफ’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 40.40 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. मंगळवारी हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अनेक हिंदी चित्रपटांना मागे टाकत आहे. अजय देवगणचा ‘शैतान’ (55 लाख रुपये) आणि क्रू (3.50 कोटी रुपये) यांचा या यादीत समावेश आहे.
Ayushman Khurana : वॉर्नर म्युझिक इंडियासोबत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचणार, लवकरच येणार पहिलं गाणं
ब्लेसी दिग्दर्शित ‘आडू जीवनम: द गोट लाइफ’ 80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट बेनी बेंजामिन यांनी लिहिलेल्या ‘आडू जीवनम’ नावाच्या कादंबरीपासून प्रेरित आहे. शिवाय जिमी जीन-लुईस, अमाला पॉल आणि शोभा मोहन या चित्रपटाचा भाग आहेत.