तुकाराम मुंढेंना प्रिती झिंटाचा पाठिंबा? ‘टीम तुकाराम मुंढे’ लिहिलेला टी-शर्ट घालून दिसली अभिनेत्री, व्हिडीओ चर्चेत

सोशल मीडियावर प्रीती झिंटाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून तिच्या लूकपेक्षा तिच्या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Untitled Design   2026 09 07T113739.403

Untitled Design 2026 09 07T113739.403

Priti Zinta supports Tukaram Mundhe : बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये तिच्या लूकपेक्षा तिने परिधान केलेल्या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रिती झिंटाने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला असून त्यावर ठळक अक्षरात ‘टीम तुकाराम मुंढे’ असं लिहिलेलं दिसत आहे. त्यामुळे प्रितीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून तुकाराम मुंढे यांना तिचा पाठिंबा असल्याचीही चर्चा रंगली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्रिती झिंटा कॅज्युअल लूकमध्ये पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळी जीन्स आणि स्पोर्ट्स शूज असा साधा पण स्टायलिश लूक तिने केला आहे. मात्र या संपूर्ण लूकमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे तिच्या टी-शर्टवरील ‘टीम तुकाराम मुंढे’ हा मजकूर. प्रितीसारख्या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीने अशा प्रकारचा टी-शर्ट परिधान केल्यामुळे सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

एमपीएससी अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्यासाठी परीक्षार्थी रस्त्यावर; दिपकेंसह मविआचा आंदोलनाला पाठिंबा

तुकाराम मुंढे हे कडक शिस्त, स्पष्ट भूमिका आणि प्रशासकीय कामकाजाच्या त्यांच्या विशिष्ट पद्धतीसाठी ओळखले जातात. प्रशासकीय सेवेत विविध पदांवर काम करताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे ते अनेकदा चर्चेत राहिले आहेत. सध्या महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनातील त्यांच्या कामाचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीला सर्वसामान्य नागरिकांकडून पाठिंबा मिळत असल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीची चर्चा केवळ सर्वसामान्य नागरिकांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर मनोरंजन क्षेत्रातील काही सेलिब्रिटींकडूनही त्यांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं आहे. आता प्रिती झिंटा ‘टीम तुकाराम मुंढे’ असं लिहिलेला टी-शर्ट परिधान केलेली दिसल्याने तिनेही मुंढे यांच्या कामाला पाठिंबा दर्शवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याआधी सलमान खान आणि ट्विंकल खन्ना यांसारख्या सेलिब्रिटींनीही तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीचं कौतुक केल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर आता प्रिती झिंटाचा ‘टीम तुकाराम मुंढे’ टी-शर्टमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत असून चाहते लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपली मतं व्यक्त करत आहेत.

Exit mobile version