Download App

Priya Bapat: प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामत सोबतचा रोमँटिक फोटो, म्हणाली…

Priya Bapat: प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांची जोडी मराठी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. (Romantic photos) दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेटिंग केल्यानंतर संसार थाटला आहे. (Social media) गेल्या १७ वर्षांपासून दोघंही एकमेकांची उत्तमप्रकारे साथ निभावत असल्याचे बघायला मिळत आहे.


एक आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे सतत बघितलं जात असत. त्यांच्या नात्यातलं प्रेम व्यक्त करणं किती महत्वाचं असतं हे प्रिया बापटने तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नवऱ्यावरचं प्रेम सगळ्यांसमोर व्यक्त करण्यात काय हरकत आहे, असं म्हणत ती उमेशबरोबरच एक रोमँटिक अंदाजामधला फोटो शेअर केला आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी कायम चाहत्यांना आवडत असल्याचे बघायला मिळत असते. त्यांचं एकमेकांवरील प्रेम अनेकदा त्यांच्या पोस्टमधून व्यक्त होत असताना आपण बघत असतो.

नुकतंच प्रियाने उमेशबरोबरचे दोन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात ती उमेशबरोबर खूप रोमँटिक झाल्याचे दिसत आहे. त्याला किस करत आहे. तर उमेशच्या चेहऱ्यावर देखील आश्चर्य आणि हसू असे दोन्ही हावभाव बघायला मिळत आहे. प्रियाने ‘सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं मला भयंकर आवडतं’ असं कॅप्शन देखील दिले आहे. आणि दोघांचा हा क्युट फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचा बघायला मिळत आहे.

Mumbai सेन्सॉर बोर्डाने लाच घेतल्याचा आरोप; अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

तसेच प्रियाचं प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत चाहत्यांना देखील खूपच आवडल्याचे दिसतंय. अनेक चाहत्यांनी तिला ‘अगदी बरोबर’ असं म्हणत तिला पाठिंबा देत आहेत.’काय वाईट आहे त्यात’ असं म्हणत मराठी कलाकारांनी प्रियाला दाद दिल्याचे बघायला मिळत आहे. सध्या हे गोड कपल ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकातून चाहत्यांचा जोरदार मनोरंजन करत आहे. आणि पहिल्या दिवसापासून या नाटकाचे प्रयोग अगदी हाऊसफुल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज