Priya Bapat: ‘मला शोधू शकता का तुम्ही?’ जुना फोटो पोस्ट करत प्रियाने विचारला चाहत्यांना प्रश्न?

Priya Bapat: मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या खास अभिनयासाठी ओळखली जाते. प्रिया बापट ही लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे तिच्या अभिनयाने प्रियाच्या लहानपणापासूनच चहा त्यांना वेड लावला आहे. (Social media) प्रियाचा चित्रपट किंवा मालिका म्हटलं तर चाहतेही खूपच उत्सुक असतात. प्रियाने अनेक मराठी मालिका (Marathi serials), नाटक, सीरिज आणि चित्रपटांमधून तिच्या […]

Priya Bapat

Priya Bapat

Priya Bapat: मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या खास अभिनयासाठी ओळखली जाते. प्रिया बापट ही लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे तिच्या अभिनयाने प्रियाच्या लहानपणापासूनच चहा त्यांना वेड लावला आहे. (Social media) प्रियाचा चित्रपट किंवा मालिका म्हटलं तर चाहतेही खूपच उत्सुक असतात. प्रियाने अनेक मराठी मालिका (Marathi serials), नाटक, सीरिज आणि चित्रपटांमधून तिच्या अभिनयाचा ठसा मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवरही उमटवला आहे.


2000 साली झी मराठीवर आलेली ‘दे धमाल’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील एक फोटो शेअर करत प्रियाने एक खास आठवण सांगितली आहे. दे धमाल ही मालिका सुरू होती तेव्हा प्रियाचं वय 14 ते 15 वर्ष होतं. या मालिकेत सुद्धा दिले शाळेत जाणाऱ्या एका क्युट मुलीची भूमिका प्रियाने साकारली होती. या मालिकेत शालेय असणाऱ्या एकाच सोसायटीतील मित्र-मैत्रिणींची कथा दाखवण्यात येत होती. यात काही ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्री ही होत्या. त्याकाळी या मालिकेला प्रेक्षकांकडून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत होता.

या मालिकेतील एक फोटो शेअर करत प्रियाने नेटकरांना आणि चहा त्यांना प्रश्न विचारला आहे की, ‘तुम्हाला आठवते काही सिरीयल? मला शोधू शकता का तुम्ही?’ प्रियाच्या या पोस्टवर नेटकर यांच्या कमेंट्सचा जणू काही पाऊसच पडत आहे. कमेंट्स करून नेटकरी म्हणत आहेत की, ‘प्रिया जो कोणी तुला ओळखू शकणार नाही, तो मराठी माणूस नाही’.

सेक्रेड गेम्स 2 मध्ये इंटिमेट सीन शूट करताना मासिक पाळीच्या… अमृता सुभाषने सांगितला अनुभव

या पोस्ट केलेल्या फोटोमध्ये प्रियाने शाळेत जाणाऱ्या मुलीचा ड्रेस घातलेला आहे. हा फोटो पाहून अनेकांना त्यांच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्यासारख्या वाटत आहेत. प्रियाच्या करियर बाबत बोलायचं झालं तर काकस्पर्श सारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये प्रियाने काम केले आहे. सध्या तिची ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेबसिरीज प्रचंड लोकप्रिय होत आहे. या वेबसिरीजचा तिसरा भाग सध्या प्रदर्शित झाला आहे आणि आणि या वेबसिरीजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.

Exit mobile version