Priya Berde Press Conference : कोरोना काळात कलाकारांचे मोठे हाल झाले. यामध्ये सर्वाधिक हाल हे तमाशातील तसेच लोककलावंतांचे झाले. काम नसल्याने अक्षरशः तमाशातील कलावंतांवर धुनी भांडी करण्याची वेळ आली. कलाकारांचे अशी अवस्था पाहून वाईट वाटते. कलाकारांवर आलेली वेळ व त्यांचे होणारे हाल सांगत असताना प्रिया बेर्डे यांच्या डोळ्यात आश्रु आले व भर पत्रकार परिषदेतच प्रिया बेर्डे रडल्या.
भाजप सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी कलाकारांविषयी भावना व्यक्त केल्या. गेली ४० वर्ष मी काम करत आहेत. वयाच्या १२ व्या वर्षी मी सिनेसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. मात्र आजच्या घडीला मनोरंजन क्षेत्रासाठी काम करणारी कुठलीही संस्था नाही. इंडस्ट्री मध्ये कलाकार आणि इतर लोकांमध्ये भेदभाव केला जातो. याबाबत मी आवाज देखील उठवला आहे, मात्र याचा मला त्रास देखील सहन करावा लागला आहे.
कोरोना काळात कलाकारांचे किती हाल झाले. अनेकांना असं वाटत की आम्ही खूप श्रीमंत आहोत मात्र असे काही नाही. कोरोना काळात तळागाळातील कलाकारांचे मोठे हाल झाले. अनेकांना काम नसल्याने त्यांचे आर्थिक हाल देखील झाले. आमच्या कलाकारांच्या मदतीसाठी आम्ही संस्था स्थापन केली. कलाकारांना मदत केली.
JPC समितीला पंतप्रधान मोदी का घाबरतात? नाना पटोले आक्रमक
…म्हणून राष्ट्रवादी सोडली
कलाकारांसाठी काम करत असताना आता आपल्याला खंबीर पाठिंब्याची गरज असल्याचे जाणवले व भारतीय जनता पक्षात सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला मर्यादा होत्या, मला काम करायचं होत. मात्र माझ काम मर्यादित होत. कलाकारांसाठी मला काम करायचं असल्याने मी भाजपात आले. मला भाजपात स्पेस मिळाला. भाजपा नेते मदत करतात लगेच भेटतात. मला प्रसिद्ध व्हायची इच्छा नाही, असेही बेर्डे म्हणाल्या.
राष्ट्रीय पक्ष दर्जा गेल्याचा मविआला फटका बसणार का? पाहा जयंत पाटील काय म्हणाले…
आज भाजप सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राहून मी आमच्या कलाकारांसाठी काम करत आहे. मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नाही. हिंदी सिनेमांपुढे मराठी सिनेमांना थिएटर्स मिळावे यासाठी थिएटर्स चालकांचे पाय धरावे लागतात. अशी मराठी कलाकारांची दुरावस्था सध्या झालेली आहे. अशी खंत बेर्डे यांनी व्यक्त केली. तसेच पुढे बोलताना बेर्डे म्हणाल्या, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी राज्यातील नाट्यगृहाची दुरावस्था पाहता त्यांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे, याचा फायदा होईल असे बेर्डे म्हणाल्या.
गौतमी पाटील विषयवार बोलणार नाही
नृत्यांगना गौतमी पाटीलबाबत भाजप सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांनी नुकतेच एक विधान केले होते. गौतमीच्या नृत्याला कला म्हणणे बरोबर वाटणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. याविषयावर बेर्डे यांना विचारण्यात आले असता त्या म्हणाल्या, त्या विषयावर मी काहीच बोलणार नाही. मी त्या विषयावर आधीच बोलले होते. असे म्हणत गौतमी पाटील विषयावर भाष्य करणं त्यांनी टाळलं.