Shubh Mangal Saavdhan: आनंद एल राय (Anand L Rai) यांच्या कलर यलो प्रॉडक्शन निर्मित “शुभ मंगल सावधान” या रोमँटिक कॉमेडीच्या रिलीजला ६ वर्षे पूर्ण झाली 1 सप्टेंबर 2017 दिवशी रिलीज झालेला हा चित्रपट आर.एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला असून त्यात आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि भूमी पेडणेकर यांच्या भूमिका होत्या. या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले सोबतीने चित्रपटाच्या उत्तम कथेने प्रेक्षकांना उत्तम सिनेमा दिला.
“शुभ मंगल सावधान”ने इरेक्टाइल डिसफंक्शनचा विषय मोठ्या धैर्याने हाताळला. हा चित्रपट निर्भयपणे प्रेमात असलेल्या तरुण जोडप्याची गोष्ट सांगतो. अशा विषयाला विनोदी सहानुभूतीपूर्वक हाताळण्याचे राय यांची कला नक्कीच उल्लेखनीय आहे. चित्रपटाचे यश आनंद एल राय यांच्या कथाकथनाच्या वेगळ्या दृष्टीकोनाचा आणि विचारशील कथनांसह मनोरंजनाची सांगड घालण्याच्य बेस्ट उदाहरण होता. या सिनेमॅटिक चित्रपटाचा ६ वर्षांचाप्रवास सुरू असताना साजरा करत असताना रायच्या कलर यलो प्रॉडक्शनचे झिम्मा 2, फिर आयी हसीन दिलरुबा आणि तेरे इश्क में यासह अनेक अफलातून सिनेमे लवकरच येणार आहेत.
कोण आहेत आनंद एल राय ?
प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते आनंद एल राय त्यांच्या अनोख्या कथाकथनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. एक आनंददायी रोमँटिक कॉमेडी चित्रपट म्हणजे “तनु वेड्स मनू” ! या चित्रपटाने आनंद एल राय यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्दर्शक म्हणून नवीन ओळख संपादन केली. आर. माधवन आणि कंगना राणौत यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका अपारंपरिक प्रेमाच्या ट्रँगलबद्दलची खास गोष्ट सांगतो. विनोदी संवाद, हटके पात्र आणि आकर्षक गाणी आणि यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला.
Jawan : बुर्ज खलिफावर झळकला किंग खानचा जलवा! ‘जवान’च्या ट्रेलर रिलीजला तुफान गर्दी
आनंद एल राय यांच्या २०२२ मध्ये आलेल्या रक्षाबंधन चित्रपटाने भावंडांमधील नाती खूप सुंदरपणे दाखवली. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला कौटुंबिक विनोदी-नाटक, भावाचे बहिणींवरील अनोखं प्रेम या भोवती ही कथा फिरते. आनंद एल राय यांच्या दिग्दर्शनाच्या चातुर्याने आणि आकर्षक कथेने रक्षाबंधन या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात अनोखं स्थान निर्माण केलं. दिग्दर्शन आणि निर्माते आनंद एल राय यांच्या चित्रपटाचा प्रवास उल्लेखनीय आहे. लवकरच धनुष-स्टारर “तेरे इश्क में” हा नवाकोरा चित्रपट देखील भेटीला येणार आहे. झिम्मा २ आणि हसीन दिलरुबा, फिर आयी हसीन दिलरुबाचा सिक्वेल देखील येणार असल्याचं समजतंय! येणाऱ्या काळात आनंद एल राय चित्रपटाची अनोखी मेजवानी देणार आहेत यात शंका नाही.