Download App

Vishal Vs CBFC: सेन्सॉर बोर्डावरील आरोपाची CBI चौकशी करा, निर्मात्याची मागणी

Vishal Vs CBFC: तामिळ अभिनेता आणि निर्माता विशालचा (Vishal) ‘मार्क अँटनी’ सिनेमा गेल्या काही दिवसाखाली प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या हिंदी आवृत्तीसाठी सेंट्रल ब्युरो ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (Central Board of Film Certification) अधिकाऱ्यानं अभिनेत्याकडे लाच मागितली घेतल्याचा आरोप विशालने यावेळी केला आहे. (Corruption Charges Against CBFC) याबद्दल निर्माता जॅकी भगनानीला या प्रकरणाविषयी विचारलं असता त्यानं असा अनुभव आपल्याला एकदाही आला नसल्याचं यावेळी सांगितले आहे. तसेच विशालनं केलेले आरोप जर अचूक असतील असतील तर त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी निर्माता अशोद पंडित (Producer Ashod Pandit) यांनी केली आहे.

या प्रकरणी अभिनेता विशालनं सेन्सॉर बोर्डवर केलेल्या आरोपांवर सिनेमा दिग्दर्शक आणि निर्माता अशोक पंडित यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केल्याचे बघायला मिळत आहे. त्याने सांगितले आहे की या प्रकरणात दोन व्यक्तीचे नावं सध्या समोर आले आहेत. यामध्ये एम राजन आणि जिजा रामदास. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही मुंबई सेन्सॉर बोर्डाचे कर्मचारी नसल्यचे समोर आले आहे. यामुळे या प्रकरणात सीबीएफसी अधिकाऱ्यावर आरोप करणं योग्य नाही.

परंतु जर आरोप होत असतील तर या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. तसेच लाच मागणारा अधिकारी त्याच्या थेट खात्यात पैसे घेणार हे उघड आहे. विशालनं नाव दिलेल्या या दोन लोकांना विचारले पाहिजे की त्यांनी CBFC मधून कोणाच्या सांगण्यावरून हे पैसे घेतले आहेत का? या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी यावेळी निर्माता अशोक पंडित यांनी केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

तामिळ अभिनेता विशालने CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) मुंबईच्या अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याचा आरोप केला आहे. तामिळ अभिनेता विशालने त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘मार्क अँटनी’ या सिनेमाच्या हिंदी सेन्सॉर अधिकारांसाठी सेंट्रल ब्युरो ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) साडेसहा लाखाची लाच घेतल्याचा आरोप केला आहे.

याबद्दल विशालने सोशल मीडियावर या समस्येकडे लक्ष वेधत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केल्याचे बघायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना या घटनेबद्दल कठोरपणे लक्ष घालण्यास सांगितले आहे.

Mumbai सेन्सॉर बोर्डाने लाच घेतल्याचा आरोप; अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अभिनेता विशालने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट शेअर करत असताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रुपेरी पडद्यावर दाखवला जाणारा भ्रष्टाचार ठीक आहे. परंतु खऱ्या आयुष्यामध्ये हा भ्रष्टाचार पचवू शकणार नाही. विशेषत: सरकारी कार्यालयात आणि त्याही पेक्षा वाईट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कार्यालयामध्ये बघायला मिळत आहे.सिनेमा मंजूर होण्यासाठी साडेसहा लाख रुपये आता मोजावे लागणार आहे.

Tags

follow us