Download App

Ankush Teaser: अ‍ॅक्शनचा भरणा असलेल्या ‘अंकुश’चा थरारक टीझर प्रदर्शित

Ankush Teaser: बीडचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि चित्रपट निर्माते राजाभाऊ घुले यांचा आगामी बिगबजेट, अॅक्शनचा दमदार तडका असलेला ‘अंकुश’ हा (Ankush Teaser Out) चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि राज्याचे माजी मंत्री तसेच परतुर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते नुकताच मुंबई येथे प्रदर्शित करण्यात आला.

राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कथानकाला प्रेमकथेची जोड असलेल्या ‘अंकुश’ या सिनेमाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियावर (Social media) चांगलाच हिट ठरला आहे. ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या (Omkar Film Creation) माध्यमातून राजाभाऊ घुले ‘अंकुश’ या मराठी सिनेमाद्वारे सिनेमा निर्मितीमध्ये दमदार एन्ट्री करत आहे. सिनेमाची कथा नामदेव मुरकुटे यांची आहे. तसेच दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांचे आहे. मराठीतील दिग्गज संगीतकार अमितराज आणि चिनार- महेश या सिनेमाचे संगीतकार आहे.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांनी या सिनेमाचे पार्श्वसंगीत केल्याचे बघायला मिळणार आहे. तसेच मंगेश कांगणे, क्षितिज पटवर्धन, समृद्धि पांडे आणि मंदार चोळकर यांनी गीताचे लेखन केलं आहे. तर सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, हृषिकेश रानडे, अमितराज , हर्षवर्धन वावरे, राहुल सक्सेना, नकाश अजीज आणि केतकी माटेगांवकर यांच्या सुमधुर आवाजामध्ये सिनेमाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहे.

तसेच नागराज दिवाकर यांनी छायांकन, तसेच अनेक पुरस्कार प्राप्त संकलक नीलेश गावंड यांनी या सिनेमाच्या संकलनाची धुरा सांभाळली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि केजीएफसारख्या सिनेमाचे अॅक्शन दिग्दर्शक विक्रम मोर, विख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी नृत्य दिग्दर्शन, कलादिग्दर्शन गिरीश कोळपकर यांनी केलं आहे. तसेच विशाल चव्हाण कार्यकारी निर्माताची धुरा सांभाळली आहे.

Mission Raniganj: खिलाडी कुमारचा ‘मिशन रानीगंजचा थरारक ट्रेलर, पाहिलात का?

या सिनेमात केतकी माटेगावकर, स्वप्नदीप घुले. सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर, मंगेश देसाई, ऋतुजा बागवे, शशांक शेंडे, गौरव मोरे, नागेश भोसले, पूजा नायक अशी दमदार स्टारकास्ट असल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमात सामान्य कुटुंबातला तरुण, त्याच्या आयुष्यामध्ये आलेली तरुणी, कॉलेज जीवनामध्ये उमलणारं प्रेम, काहीतरी करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाला समोर आलेला राजकारणाचा डाव असा थरार ‘अंकुश’ या मराठी सिनेमात बघायला मिळणार आहे. म्हणून मराठी सिनेमासृष्टीतला दमदार अॅक्शनपट म्हणून अंकुश या सिनेमाकडे बघितलं जात आहे.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये धडाकेबाज अॅक्शनचं दर्शन घडत आहे. यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. गायिका अभिनेत्री केतकी माटेगावकरचं लोभस दिसणं देखील सिनेमाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असल्याचे बघायला मिळणार आहे. पुरेपूर मनोरंजनाचा आनंद देणारा ‘अंकुश’ हा सिनेमा बघण्यासाठी चाहत्यांना केवळ ६ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Tags

follow us